शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे गेटवरील रखडलेल्या उड्डाण पुलामुळे वाहतुकीचा पचका

By admin | Updated: April 8, 2015 01:54 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील रेल्वे फाटक क्रमांक १४ च्या निर्माणाधीन उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे़

हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील रेल्वे फाटक क्रमांक १४ च्या निर्माणाधीन उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे़ रखडलेल्या उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा पचका झाला आहे़ रेल्वेगेट बंद राहत असल्याने दररोज वाहनांच्या रांगा लागत असून अपघातांतही वाढ झाली आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ उड्डाण पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे़ यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातात वाढ झाली आहे़ सदर उड्डाण पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश रेल्वे विभागाला द्यावे, अशी मागणी नगरविकास सुधार समितीच्या वतीने करण्यात आली़ याबाबत नगर सुधार समितीचे मनोज रूपारेल, राजेश जोशी यांनी खा़ रामदास तडस यांना निवेदन दिले़ यावरून खा़ तडस यांनी त्वरित रेल्वेचे विभागीय महाप्रबंधक ओ.पी. सिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. सिंग यांच्यानुसार राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम करण्यासाठी अडीच तास रेल्वे वाहतूक बंद करण्याचा प्रस्ताव होता; पण सदर प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने नामंजूर केल्याने नवीन प्रस्ताव पुन्हा रेल्वे विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पुढील चार महिन्यांत काम पूर्ण होणार आहे़ या चर्चेवर खा. तडस यांनी नाराजी व्यक्त करून कामास आधीच मोठा कालावधी लागला असून हे काम आता दोन महिन्यांत युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश दिले़ याप्रसंगी आ़ समीर कुणावार, नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, नरेश चुंगडे, राकेश नगरवार, डॉ. मधू गोयनका, डॉ. अशोक मुखी, डॉ. प्रकाश लाहोरी, विजय बाकरे, किशोर दिघे, अ‍ॅड. मुरली मनोहर व्यास, विजय अग्रवाल, सरोज माटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़(शहर प्रतिनिधी)