शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बोरधरणवर पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: July 13, 2016 02:51 IST

चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या तसेच हिरव्यागार दृश्य व निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बोरधरण येथे हजारो पर्यटक येतात.

पाटबंधारे विभागाचा कानाडोळा : ५१ वर्षांपासून पर्यटक सुविधांच्या प्रतीक्षेत विजय माहुरे घोराड चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या तसेच हिरव्यागार दृश्य व निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बोरधरण येथे हजारो पर्यटक येतात. या पर्यटकांची सुरक्षा आजही वाऱ्यावरच आहे. बोरधरणाला ५१ वर्षे झाली असताना पर्यटकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत पर्यटकांना सुरक्षा व सुविधा पुरवाव्या, अशी मागणी करण्यात येत आहे. बोर नदीवर सेलू येथून १७ किमी अंतरावर बोरी गावाच्या पूढे १९५७ मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली. या धरणाचे बांधकाम १९६५ मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून हे धरण बोरधरण म्हणून ओळखले जाऊ लागले. या धरणाला यशवंत धरण, असेही नाव आहे. जिल्ह्यात निसर्गरम्य असलेल्या बोरधरण या पर्यटकांना मोहीत करणाऱ्या स्थळाला शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे; पण पर्यटकांना अद्याप कुठल्याही सोयी सुविधा पुरविण्यात आल्या नाही. परिणामी, पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यटन विकास महामंडळाने रिसोर्ट सुरू केले असले तरी बालोद्यान मोडकळीस आले आहे. यामुळे परिवारासह आलेल्या पर्यटकांना धरणाच्या भिंतीवरच आपली शिदोरी उघडून सहभोजनाचा आनंद घ्यावा लागत आहे. सद्यस्थितीत धरणामध्ये पाण्याची पातळी कमी आहे. यामुळे पर्यटक प्रतिबंधीत क्षेत्र असतानाही धरणामध्ये जाताना दिसतात. एवढेच नव्हे तर धरणातील पाण्यात पोहण्याचा तसेच आंघोळीचा आनंद पर्यटक घेताना दिसतात. त्यांना मनाई करण्यासाठी कुणी सुरक्षा कर्मचारीही नसल्याने पर्यटक लहान मुलांनो सोबत घेऊन तेथील पाण्याचा आनंद लुटतात. हा आनंद घेत असताना काही विपरित घडले तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बोरधरण सकाळपासून सायंकाळपासून खुले असते; पण रात्री उशिरापर्यंत पर्यटक येथे धरणाच्या परिसरात वावरत असल्याचे दिसून येते. यामुळे पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची स्थिती आहे. येथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे गरजेचे झाले आहे. या स्थळाला नागपूर, वर्धा जिल्ह्यातील पर्यटक, शाळांच्या सहली येतात. बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी येणारे पर्यटकही हिरव्यागार दृश्याचा तसेच धरणाचा आनंद घेतात. पर्यटकांना शासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाऊस सुरू असताना किमान उभे राहण्यासाठी जागोजागी निवारे, वाहनतळाची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कर्मचारी नियुक्त करणे तसेच फलक लावणे गरजेचे आहे. या परिसरात फेरफटका मारला असता दारूच्या रिकाम्या शिशाही जागोजागी दिसून येतात. बोरधरण हे पाटबंधारे विभागांतर्गत येत असून सर्वात जुने पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह आहे. त्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करणे गरजेचे झाले आहे. शासनाकडून पर्यटन स्थळाच्या विकासासाठी लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. याद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो; पण बोरधरण येथे त्याचा अभाव दिसतो. पर्यटन स्थळी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देताना टेकड्यांच्या मधोमध असलेले धरण, हिरवा शालू परिधान केलेल्या टेकड्या, बोर व्याघ्र प्रकल्प पाहता या स्थळाच्या विकासाकडे लक्ष दिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास वाव आहे. बोरधरण निर्मितीमुळे परिसरातील कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम झाले; पण ज्या विभागाचा या परिसराच्या विकासाला हातभार लागला, त्याच पाटबंधारे विभागाच्या वसाहतीची दुरवस्थेकडे वाटचाल दिसते. अपूरे कर्मचारी, पाटचऱ्या, सायपणची दयनिय स्थिती तालुक्याच्या विकासाला मारक तर ठरणार नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. बोरधरणावर पावसाळ्याच्या दिवसांत होणारी गर्दी लक्षात घेता येथे सुरक्षा व्यवस्था निर्माण करीत सुविधा प्रदान कराव्या, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.