शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात वळू ठार

By admin | Updated: December 28, 2016 00:41 IST

तालुक्यातील बोरगाव (टु.) शेतशिवारात वाघाने धुमाकुळ घातल्यामुळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण

बोरगाव (टुमणी) येथील घटना : वनविभागाचे दुर्लक्ष; गावकऱ्यांची रात्र गस्त वर्धा : तालुक्यातील बोरगाव (टु.) शेतशिवारात वाघाने धुमाकुळ घातल्यामुळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. वाघाच्या हल्ल्या एक वळू ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. यामुळे या भागात कामाकरिता जाताना शेतकऱ्यांत भीती असल्याचे पसरली असून वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे. बोरगाव (टुमणी) येथील शेतकरी साहेबराव शिलसकर व अनिल बापूराव शिलसकर यांच्या शेतात गोठा आहे. शेत गावाजवळ असल्याने गोठ्यात नेहमीप्रमाणे गायीसह तीन गोऱ्हे बांधून ठेवतात. रात्री वाघ शेतातील गोठ्यात आला व बांधून असलेल्या एका वळूचा जीव घेतला. रात्रीच्या अंधारात झालेल्या या हल्ल्यामुळे सकाळी घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती साहूर परिक्षेत्राचे वनअधिकारी पोहेकर यांना देण्यात आली. घटनास्थळ पाहून पंचनामा करण्यात आला. सोबतच शवविच्छेदनही झाले. ही घटना घडून तीन दिवसांचा कालावधी लोटला व त्याच ठिकाणी शेजारी असणाऱ्या अनिल शिरसकर यांच्याही एका गोऱ्ह्यावर वाघाने झडप घातली. यात तो जखमी झाला आहे. तेथे दोन वळूंसह एक गाय होती. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेला वळू जिवंत आहे. पण त्याची मृत्यूशी झुंज कायम आहे. गावशेजारी असलेल्या गोठ्यात येऊन वाघ शिकार करीत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. वाघ कोणत्या मार्गाने येतो हे पाहण्याकरिता ग्रामस्थांनी आता रात्र गस्त सुरू केली. पण वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. वाघाच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)