शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

खनिकर्म अधिकाऱ्याला तीन वर्षे कारावास

By admin | Updated: August 12, 2014 23:54 IST

गिट्टीखदानीच्या नूतनीकरण परवाण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच मागणारा येथील तत्कालीन जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये याला तीन वर्षे सश्रम कारावास व लाचलुचपत

जिल्हा न्यायालयाचा निकाल : २००५ मध्ये स्वीकारली होती लाच वर्धा : गिट्टीखदानीच्या नूतनीकरण परवाण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच मागणारा येथील तत्कालीन जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये याला तीन वर्षे सश्रम कारावास व लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या दोन्ही कलमान्वये ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी मंगळवारी दिला. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, वर्धेतील गौरक्षण वॉर्ड येथील रामकुमार रामदास बरडिया यांच्याकडे गिट्टीखदान होती. त्याची लिज २००२ मध्ये संपली होती. बरडिया खाणीच्या नूतनीकरणाच्या प्रयत्नात होते. यावेळी राजविलास लक्ष्मण गजभिये हे जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून कार्यरत होते. जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेले बरडिया यांचा अर्ज खनिकर्म कार्यालयात आला होता. मे २००५ मध्ये गजभिये याने नूतनीकरणाच्या कारवाईकरिता बरडिया यांना पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. पैकी एक हजार रुपये फिर्यादीने त्याला दिले होते. २ मे २००५ रोजी तक्रारकर्ता बरडिया यांनी गजभियेची भेट घेतली असता त्याने पुन्हा लाचेची मागणी केली. यावरून बरडिया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीवरून ३ मे २००५ रोजी सरकारी साक्षदाराच्या समक्ष मागणी करून लाचेच्या रकमेपैकी दोन हजार रुपये स्वीकारताना गजभिये याला रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुरेश महाले यांनी केली. त्यांनी तपास पूर्ण करून सदर प्रकरण न्यायालयात सादर केले. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील घनश्याम अग्रवाल यांनी युक्तिवाद करून आरोपीला कठोर शिक्षेबाबत विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश एस. एस. अडकर यांनी सरकारची बाजू ग्राह्य धरून राजविलास गजभिये याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत दोन वर्ष शिक्षा व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास तसेच कलम १३ अंतर्गत तीन वर्षे कठोर शिक्षा व १५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.(प्रतिनिधी)