आगरगाव येथील प्रकार : दोन दिवसांची पोलीस कोठडीकारंजा (घा.) : तालुक्यातील आगरगाव येथे चंदनाची झाडे तोडणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या तिघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उमेश श्रीराम ठाकरे, रा. पोरगव्हाण, यशवंत संतोष कोहळे, रा. जोगा(हेटी), सुभाष नानाजी ठाकरे, रा.किनीमोई, अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.तालुक्यातील आगरगाव येथील रामचंद्र कडवे यांच्या काकू शांताबाई श्रावण चौधरी यांच्या शेताच्या धुऱ्यावर चंदणाची चार झाडे होती. ती झाडे सोमवारी रात्री तोडत असल्याची माहिती गावाकऱ्यांना मिळाली. त्यांनी पोलिसांना बोलावत आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी तिघांना अटक करून त्यांच्या जवळुन चार झाडांचे तोडलेले चंदनाचे लाकुड, एक दुचाकी व वृक्षतोडीचे साधन जप्त करण्यात आले. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची कोठडी देण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)
चंदनाची झाडे तोडताना तीन जणांना रंगेहात अटक
By admin | Updated: August 26, 2015 02:07 IST