शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वृक्षांचा जातोय बळी

By admin | Updated: May 29, 2015 01:52 IST

सामाजिक वनीकरण विभाग देवळीअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली.

धुरे जाळणे झाडांच्या मूळावर : लागवड योजनेतील वृक्षांवर संक्रांतविजयगोपाल : सामाजिक वनीकरण विभाग देवळीअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. यातील काही झाडे दोन ते तीन फुट उंच झाली आहेत; पण ही झाडे आगीत भस्मसात होत असल्याचे दिसते. यामुळे शासनाचे लाखो रुपये व्यर्थ जात असून योजनेचा बट्याबोळ होत आहे.केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाच्यावतीने शतकोटी वृक्षलागवड योजना राबविण्यात येत आहे. यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देत आहे. सामाजिक वनीकरण विभाग देवळीतर्फे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जून २०१४ मध्ये कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. यात सप्तपर्णी, गुलमोहर, कशिया, पिंपळ आदी प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. सध्या लागवड केलेली रोपे तीन ते चार फुट उंच झाली आहेत. संबंधित विभागाने या झाडांचे संरक्षण करता यावे म्हणून कठडे लावणे गरजेचे होते. सध्या शेतशिवारात आंतर मशागत व काडी कचरा पेटविण्याची कामे सुरू आहेत. अनेक शेतकरी शेतातील धुरे पेटवून देतात. ही आग पसयरून रस्त्यापर्यंत येत असल्याने झाडे जळत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या झाडांचे आयुष्य धोक्यात आले आहे. या झाडांना उन्हाळ्यात नियमित पाणी देणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसन नाही. पाणी मिळत नसल्याने अनेक झाडांनी माना टाकल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा बट्याबोळ होत आहे. यात लाखो रुपयांचा निधीही व्यर्थ खर्च होत असल्याचे दिसते. ग्रामपंचायत अंतर्गत लावलेल्या झाडांचीही तशीच अवस्था आहे. झाडांना कठडेच नसल्याने अनेक झाडे गुरांनी फस्त केली आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)