शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय प्रस्थापनेशिवाय आरक्षण समाप्ती नाही

By admin | Updated: November 26, 2015 02:09 IST

संविधानातून आलेली आरक्षणाची तरतुद ही रोजगार निर्मिती वा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हजारो वर्षांपासून ज्या समाज घटकांचे येथे शोषण झाले

देवीदास घोडेस्वार : संविधान जागर परिषद वर्धा : संविधानातून आलेली आरक्षणाची तरतुद ही रोजगार निर्मिती वा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हजारो वर्षांपासून ज्या समाज घटकांचे येथे शोषण झाले त्यांना सामाजिक न्याय देण्यासाठीची ती व्यवस्था आहे. जातीव्यवस्था संपविली तर भविष्यात आरक्षणाची गरजच राहणार नाही,असे मत संविधान सभा डिबेटस्चे मराठी भाषांतरकार प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालय आणि वर्धेतील पुरोगामी संघटनांच्या महासंघातर्फे संविधान दिनानिमित्त बुधवारी भारतीय संविधान आणि आरक्षण विषयावर आयोजित संविधान जागर परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बापुरावजी देशमुख फाऊंडेशनचे सचिव डॉ. भा. की. खडसे होते. संविधान सन्मान चळवळतील अग्रणी व माजी सनदी अधिकारी ई. झेड खोब्रागडे हे उद्घाटक होते. ओबीसी मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन चौधरी, प्राचार्य रंभा सोनाये व केंद्र समन्वयक डॉ. सुधाकर सोनोने आदींची मंचावर उपस्थिती होती. घोडेस्वार म्हणाले, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त नको अशी स्वत: आंबेडकरांचीच भूमिका होती. राजकीय आरक्षणाची मर्यादा ही केवळ १० वर्षासाठी होती. त्याचाच बाऊ करीत आरक्षण विरोधक सरसकट सामाजिक, शैक्षणिक आरक्षणही १० वर्षासाठीच होते, असा संभ्रम पसरवितात ई. झेड. खोब्रागडे यांनी संविधान जागराची लोकचळवळ व्हायला हवी असे मत व्यक्त केले. नितीन चौधरी यांनीही आरक्षणाविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करताना डॉ, खडसे म्हणाले, मूल्यांची ताकद चिरंतन असते. त्यामुळे संविधानातून मूल्यांच्या आधारे देशाची उभारणी झाली तर ती शाश्वत होईल. सहसमन्वयक डॉ. प्रियराज महेशकर, डॉ. धनंजय सोनटक्के, डॉ. मालिनी वडतकर, डॉ. प्रतिभा ताकसांडे, यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. प्रास्ताविक डॉ. सुधाकर सोनोने यांनी केले. संचालन प्रा. सोनाली सिरभाते, तर प्राचार्य डॉ. रंभा सोनाये यांनी आभार मानले. प्रा. दीपक महाजन, प्रा. प्रदीप दखणे, प्रा. विश्वकर्मा, डॉ. रेखा बोबडे, दिनेश भगत, विजय चौधरी, विनोद बावणे, प्रमोद माथनकर, मुंजेवार, आगलावे यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)