शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बालपणापासून शिस्त आत्मसात करण्याची गरज

By admin | Updated: May 13, 2014 00:05 IST

बालवयात शिस्त आत्मसात केल्यास कुठलेही काम निकराने करण्याची सवय लागते. ही सवय मोठेपणी जास्त कामी येते.

सेवाग्राम : बालवयात शिस्त आत्मसात केल्यास कुठलेही काम निकराने करण्याची सवय लागते. ही सवय मोठेपणी जास्त कामी येते. शिबिरात सर्व कामे ही समुहाने करावयाची असतात. देशही एक समुहच असतो पण कामासाठी शिस्त मात्र आवश्यक असते. त्यामुळे शिस्तीचे धडे गिरविण्याची गरज नई तालिम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी व्यक्त केली.

नई तालिम समिती परिसरात रविवारपासून लहान मुलांच्या शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रसेवादल ध्वजारोहणाने शिबिराला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ज्योती कोरडे साने गुरुजी यांच्या पुस्तकांविषयी मुलांना माहिती देताना म्हणाल्या, ते मातृभक्त व देशभक्त होते, शामची आई या पुस्तकातून साने गुरुजींचे दर्शन घडते. स्वत:ला घडविण्यासाठी साने गुरुजींच्या गोष्टी, मुलांनी वाचणे आवश्यक असल्याचेर सांगून त्यांच्या विविध कथा कोरडे यांनी मुलांसमोर प्रस्तुत केल्या. दया बहन यांनी विनोबांवर कथाकथन करुन त्यांच्या कथा बालकांसमोर सांगितल्या.

गजानन सुरकार हे अंधश्रद्धेवर महिती देताना म्हणाले, समाजात भोंदूबाबांचे मोठे पेव फुटले आहे. आयुष्याचा नाश करणार्‍या घटना घडत असून याचा वोरोध करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच सामान्य माणसाचा फायदा घेऊन ते कसे लुबाडतात याचे प्रात्यक्षितही सुरकार यांनी करून दाखवित यापासून दूर राहात वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बालगण्याचे आवाहन केले.

योग, व्यायाम, संगीत, गाणी, चित्रकला, कागदकाम, चांगल्या फिल्म्स, हसत खेळत प्राथमिक गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, पोस्ट बँक, सामान्य व्यवहार कळणे, मैदान शाखा तंत्र, मैदानी खेळ, सुंदर व्याख्यान, मुल्यांकन आणि प्रार्थना असा दैनिक कार्यक्रम या शिबिरात आयोजित आहे.

कार्यक्रमाचे संचालन अविनाश सोमनाथे यांनी केले.

नितीन, गजानन अंबुलकर, संजय आत्राम, मनोज, शरद आणि डिंपल शिबिरात विद्याथ्यार्ंना मार्गदर्शन करीत आहे. ३७ मुले-मुली यात सहभागी झाली आहेत.(वार्ताहर)