शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शाळेला कुलूप ठोकताच तासाभरात मिळाला शिक्षक

By admin | Updated: June 28, 2016 01:50 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी धामकुंड येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी कुलूप ठोकल्याने चांगलीच

कारंजा (घाडगे) : शाळेच्या पहिल्या दिवशी धामकुंड येथील शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी कुलूप ठोकल्याने चांगलीच खळबळ माजली. या आंदोलनाची दखल घेत शिक्षण विभागाने तात्काळ एका तासात शाळेकरिता शिक्षकाची व्यवस्था केली. गत वर्षापासून सुरू असलेली गावकऱ्यांची मागणी या आंदोलनाने पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनीही शिक्षक शाळेत दाखल होताच कुलूप उघडले. कारंजा तालुक्यातील धामकुंड येथील जि.प. प्राथमिक शाळेत पटसंख्येनुसार मागील एक वर्षापासून एक शिक्षक कमी होता. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा मागणी करूनही दिला नाही. यामुळे शाळाव्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी २७ जूनला शिक्षक दिला नाही तर शाळेला कुलूप ठोकू, असा निर्धार व्यक्त केला. त्यानुसार आज सकाळी १० वाजता शाळेला कुलूप लावण्यात आले.याची माहिती गटशिक्षणाधिकारी धनंजय उमेकर यांना मिळताच त्यांनी गावकऱ्यांचा रोष शांत करण्याकरिता शाळेला तात्पूरता एक शिक्षक दिला. शिक्षक मिळताच गावकऱ्यांनी शिक्षण विभागाचे आभार मानत ११ वाजता कुलूप काढले. नियमित शिक्षक जि.प. कडून प्राप्त होईपर्यंत हा समायोजित शिक्षक या शाळेत काम करणार आहे. जि.प. सदस्य गोपाल कालोकर व गटशिक्षणाधिकारी उमेकर यांच्या मध्यस्तीने प्रकरण तात्पुरते क्षमले; मात्र शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळाला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. यावर शिक्षण विभागाच्या भूमिकडे साऱ्यांचे लक्ष आहे.(तालुका प्रतिनिधी)