शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

माथा ते पायथा संकल्पनेनुसार जलयुक्त शिवारची कामे घ्या

By admin | Updated: October 8, 2015 01:50 IST

जलयुक्त शिवार अभियानामध्ये गावांची निवड करताना पाण्याची आवश्यकता व उपलब्ध पाणी याचा अभ्यास करा.

आशुतोष सलील : कमी खर्चात अधिक जलसाठा, गावस्तरावरील आराखड्यांची पाहणीवर्धा : जलयुक्त शिवार अभियानामध्ये गावांची निवड करताना पाण्याची आवश्यकता व उपलब्ध पाणी याचा अभ्यास करा. प्रत्येक नाला हा माथा ते पायथा या संकल्पनेनुसार अडवून गावाचे शिवार जलयुक्त करण्यास प्राधान्य द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यात गावांच्या निवडीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, अपर मुख्य कार्र्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जलतज्ञ मनोहर सोमनाथे, माधव कोटस्थाने आदी उपस्थित होते.जलयुक्त शिवारामध्ये कमी खर्चात अधिकाधिक जलसाठे निर्माण होतील या दृष्टीने सिमेंट नालाबांध वा गाव तलावाच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य द्यावे. नवीन कामे घेताना माथा ते पायथा या संकल्पनेनुसार पाण्याची उपलब्धता बाराही महिने होईल, असे नवीन व दुरूस्तीची कामे घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या. प्रत्येक गावात जलयुक्त शिवार कार्यक्रम राबविताना गाव आराखडा हा परिपूर्ण असावा या दृष्टीने अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे. जिल्हाधिकारी समिती प्रत्येक तालुका स्तरावर याबाबत आढावा घेऊनच पुढील कार्यक्रम निश्चित करेल, अशी सूचनाही जिल्हाधिकारी सलील यांनी दिल्या. जलयुक्त शिवारांतर्गत झालेल्या प्रत्येक कामांवर जनावरांसाठी चारा उपलब्ध होईल यादृष्टीने चाऱ्याच्या जाती पशुसंवर्धन विभागातर्फे लावण्यात येणार आहे. पावसाळा संपत असताना नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्यात येणार आहे. यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन यांनी नियोजन व कार्यक्रम तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली. जयलयुक्त शिवार कार्यक्रमात गाव स्तरावर जलसाठे निर्माण करताना त्याच्या योग्य वापरासाठी ग्रामस्तरावर पाणी वापर संस्था निर्माण करण्यात येऊन अशा संस्थांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे सांगितले. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना, जलतज्ञ मनोहर सोमनाथे, माधव कोटस्थाने, प्रमोद पवार, नाबार्डच्या स्रेहलता बनसोड, आर.जी. वाहने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी र्ईलमे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, कार्यकारी अभियंता ढवळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रवीण बडगे, वन अधिकारी आदींसह सदस्यांनी उपयुक्त सूचना केल्या. प्रारंभी भारती यांनी अभियातील कामांची व नियोजनाबाबत माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)