शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी समता परिषदेचे धरणे

By admin | Updated: April 6, 2017 00:09 IST

कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि आम्ही ती मिळवणारच, अशी घोषणा करीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेने

शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध : नायब तहसीलदारांना निवेदन समुद्रपूर : कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि आम्ही ती मिळवणारच, अशी घोषणा करीत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेने बुधवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी नायब तहसीलदार लता गुजर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. महाराष्ट्रात शेतीसाठी पुरेशी वीज नाही. सिंचनाच्या सोयी नाहीत. दुष्काळात शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली जात नाही. शेतात पिकले तर उद्योगपतींना धार्जिण्या धोरणामुळे उत्पादन खर्चाएवढा भाव मिळत नाही. भाजप सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्येचा आकडा सात हजारांवर गेला; पण कर्जमाफीसाठी शासनाकडे पैसे नसल्याची सबब समोर केली जात आहे. याचा समता परिषदेने निषेध केला. म. फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी १४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देत शेतकऱ्यांची दयनीय अवस्था व शासनाच्या धोरणामुळे त्यांना आत्महत्येकडे नेणारी अवस्था विषद केली. सरकार आपले कर्तव्य पार पाडत नसेल तर कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे नमूद केले. यानुसारच समता परिषदेने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी व विधानसभेत शेतकऱ्यांसाठी निलंबित व्हावे लागलेल्या आमदारांना पाठींबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. याची सुरुवात तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधात निदर्शने करीत एकदिवसीय धरणे आंदोलनाने झाली.