शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी नर्सरी कामगारांचे धरणे

By admin | Updated: January 27, 2015 23:39 IST

जिल्ह्यातील कृषी विभाग अंतर्गत फळरोपवाटिका, टी.सी.डी. फार्म व बीजगुणन केंद्रावर कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु कामगारांचे वेतन वेळेवर केले जात नाही.

वर्धा : जिल्ह्यातील कृषी विभाग अंतर्गत फळरोपवाटिका, टी.सी.डी. फार्म व बीजगुणन केंद्रावर कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु कामगारांचे वेतन वेळेवर केले जात नाही. तसेच जुन्या कामगारांना डावलून नव्या कामगारांना कामावर घेणे सुरू आहे. त्यामुळे याविरोधात सेंटर आॅफ इंडियन टे्रड युनियन अंतर्गत कामगारांच्या वतीने धरने देण्यात आली. जांब नर्सरीवरील कामगारांचे एप्रिल ते डिसेंबर २०१४, बोर नर्सरीवरील कामगारांचे एप्रिल ते जुलै २०१४, नाचणगाव फार्मवरील कामगारांचे जुलै ते डिसेंबर २०१४ पर्यंतचे वेतन प्रलंबित आहे. सेलू नर्सरीवरील कामगारांचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे संबंधित कामगार आर्थिक अडचणीत आले आहे. जिल्ह्यातील कृषी फार्मवरील कामगारांची ज्येष्ठता सूची तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु अद्यापपर्यंत त्याची अमंलबजावणी करण्यात आली नाही. जुन्या कामगारांना जाणीवपूर्वक डावळून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात येत आहे. फळरोपवाटिका, टीसीडी फार्म व बीजगुणन आदी ठिकाणी कार्यरत कामगारांना रोजगार हमीच्या दरानुसार मजुरी दिली जाते. शासन निर्णय क्र- २०१४/प्र.क़ १५ /म.गांधी रोजगार योजना २६ फेब्रुवारी २०१४ नुसार सुधारित दर १६७ रुपये एप्रिल २०१४ पासून लागू झालेले आहेत. परंतु त्याची अमंलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे कामगारांचे पगार लवकरात लवकर द्यावे तसेच जुन्या कामागारांना कामापासून वंचित ठेण्याचा प्रकार बंद करावा या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.(शहर प्रतिनिधी)