शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भ्रष्टाचारी मुख्याध्यापकावर कारवाई करा

By admin | Updated: December 28, 2016 01:07 IST

हिंगणघाट पंचायत समितींतर्गत येत असलेल्या येरला या जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चाफले यांनी

मुख्य क ार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : हिंगणघाट पंचायत समितींतर्गत येत असलेल्या येरला या जि.प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चाफले यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तत्सम निवदेन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आले होते. यावर चौकशी सुरू झाली; पण त्याचा अहवाल अद्याप जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाला नाही. यामुळे विभागाच्यावतीने याकडे लक्ष देत या मुख्याध्यापकावर कारवाई करावी, अशी मागणी गावकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तसे निवेदन त्यांनी मंगळवारी जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना सादर केले आहे. या मुख्याध्यापकाकडून झालेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करण्याच्या मागणीकरिता गावकाऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर जि.प. कार्यालयामार्फत चौकशी अधिकारी तायडे यांच्याकडे चौकशी सोपविली. या चौकशीमध्ये १७ पालकांचे व वर्गणीदारांचे लेखी बयान घेण्यात आले आहे. या चौकशीला एक महिन्याचा कालावी लोटला. परंतु, सदर मुख्याध्यापकावर प्रशासनामार्फत अजून पर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याउलट सदर मुख्याध्यापकास कारवाईपासून जि.प. प्रशासनाकडून वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या पालकांकडून करण्यात आला आहे. चौकशीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाल्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी सदर मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्याबाबतचा अहवाल सादर केला नाही. यामुळे या प्रकरणात गडबड होण्याची शक्यता असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सदर प्रकारामुळे शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर पाणी व शालेय पोषण आहार या पासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. निवेदन देतेवेळी मिलिंद वागदे, जयवंता पंधरे, मारोती ताजने, विनोद वानखेडे, गुलाबराव पंधरे उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.(प्रतिनिधी)