शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

By admin | Updated: March 11, 2017 00:34 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूकीत इलेक्ट्रानिक वोटींग मशीनमध्ये गोंधळ

आर्वीत सर्वपक्षीय मोर्चा : रस्त्यावर तहसीलदारांना निवेदन आर्वी : जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणूकीत इलेक्ट्रानिक वोटींग मशीनमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप सर्वत्र होत आहे. यामुळे शुक्रवारी आर्वीत या मुद्यावर भाजप वगळता ईव्हीएमचा विरोध करीत सर्व पक्षांनी एकत्र येत या मशीनची प्रतिकात्मक पे्रतयात्रा काढली. मोर्चाद्वारे यावेळी बॅलेट पेपरवर निवडणूक पद्धती अंमलात आणण्याची मागणी लावून धरली. आर्वीत आयोजित या सर्वपक्षीय मोर्चाचा प्रारंभ दुपारी १ वाजता झाला. हा मोर्चा सिव्हील लाईन गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसीलदार विजय पवार यांना इव्हीएम मशीनची पद्धत बंद करून बॅलेट पेपर निवडणूक घेण्याच्या मागणीचे सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले. या निवेदनात आर्वीत झालेल्या नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला. या मोर्चात इव्हीएम हटवा लोकशाही वाचवा, हुकूमशाही बंद करा आदी नाऱ्याचे फलक मोर्चेकऱ्यांच्या हाती देण्यात आले होते. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करुन येणारी निवडणूक बॅलेटच्या पद्धतीने करण्याची मागणी मोर्चात सहभागी पक्षांच्या प्रमुखांनी केली. या मोर्चाचे नेतृत्त्व आमदार अमर काळे यांनी केले. मोर्चानंतर शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली. लोकशाहीत मतदान चोरीचे प्रकार सुरू झाल्याचा आरोप आ. अमर काळे यांनी केला. पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ करून भाजपाने ही निवडणूक जिंकल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने संदीप काळे, शिवसेनेच्यावतीने निलेश देशमुख, बसपाचे सुनील डोंगरे, पिरीपाचे मेघराज डोंगरे, युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे आदींनी विचार व्यक्त केले. प्रत्येकाने ईव्हीएमच्या घोळाची चौकशीची करण्याची मागणी केली. सभेचे संचालन करीत प्रा. पंकज वाघमारे यांनी आभार व्यक्त कले. या मोर्चात काँग्रेस, बसपा, राकाँ, पीरिपा, युवा स्वाभिमान, शिवसेना, प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होतीे. यावेळी तालुक्यातील महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.(तालुका/शहर प्रतिनिधी) त्या घटनेचा निषेध आर्वीत दोन दिवसांपासून भाजपा आणि प्रहार सोशल फोरमच्या कार्यकर्त्यांत वाद उफाळला आहे. प्रहार सोशल फोरमचे अध्यक्ष बाळा जगताप हे घटनेच्यावेळी हजर नसतानाही केवळ राजकीय आकसापोटी व पोलीस विभागावर दबाव आणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचाही यावेळी आ. काळे यांनी निषेध नोंदविला.