शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील सराईत गुन्हेगार अटकेत

By admin | Updated: September 2, 2014 23:58 IST

गणेश नगर येथे झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी भंडारा येथील एका कुख्यात चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या जवळून एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल

वर्धा : गणेश नगर येथे झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी भंडारा येथील एका कुख्यात चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या जवळून एक लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जितेंद्र उर्फ लड्डू नरेंद्रसिंग तोमर (२३) रा. संत कबीर वार्ड, भंडारा असे असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. १८ आॅगस्ट २०१४ रोजी गणेशनगर येथील शेख सादीक शेख सत्तार (२८) हे कुटुंबीयांसह बाहेर भागी गेले होते. दरम्यान चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने व रोख ३० हजार रुपये असा एकूण ९१ हजार ८०० रुपयाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शहर ठाण्यात भादंविच्या कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला.शहर पोलिसांसह या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. चोरीच्या प्रकारावरून व पोलिसांकडे असलेल्या माहितीवरून जितेंद्र उर्फ लड्डू नरेंद्रसिंग तोमर (२३) रा. संत कबीर वार्ड, भंडारा याला ताब्यात घेतले. सदर आरोपीस गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता जितेंद्र तोमर हा १८ आॅगस्ट २०१४ रोजी वर्धा न्यायालयात तारखेवर आला होता. दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान त्याने गणेश नगर वर्धा येथील भागात चोरी केल्याची कबूली दिली. त्याच्याजवळून चोरीस गेलेली सोन्याची अंगठी घड्याळ व रोख नगदी १ हजार २०० रुपये व इतर साहित्य असा एकूण एक लाख ४२ हजार रुपयांचा ५०० रुपयांचा माल जप्त केला. जितेंद्र उर्फ लड्डू नरेंद्रसिंग तोमर (२३) हा भंडारा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी संबंधाने अनेक गुन्हे नोंद आहेत. सदर आरोपीने वर्धा शहरात आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, सयहायक फोजदार उदयसिंग बारवाल, हवालदार अशोक वाट, अमर लाखे, दिवाकर परिमल, आनंद भस्मे, समीर कडवे, कुलदीप टांकसाळे, मनिष साळवे यांनी केली.(प्रतिनिधी)