शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण प्रकरणातील आरोपी अटकेत

By admin | Updated: September 3, 2014 23:37 IST

एका सहावर्षीय चिमुकलीवरील अमानवी अत्याचार. त्यानंतर एका तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न या घटना ताज्या असताना सोमवारी पुन्हा एका १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला.

आरोपीच्या पत्नीमुळे अनर्थ टळला : तो निघाला जि.प.शाळेचा शिक्षकवर्धा : एका सहावर्षीय चिमुकलीवरील अमानवी अत्याचार. त्यानंतर एका तीन वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न या घटना ताज्या असताना सोमवारी पुन्हा एका १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. या घटनेनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकरणातील पसार झालेला आरोपी नरेंद्र अंबादास वसू याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरुन नरेंद्र अंबादास वसू रा. अग्रगामी इंग्लिश स्कूलसमोर वर्धा याच्याविरुद्ध कलम ३६३, ३६६, ३४१, ५०६ आणि लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घटनेनंतर तो पसार झाला. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे शहर पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. आरोपी हा कारंजा तालुक्यातील सिंदीविहिरी येथील जि.प. शाळेत शिक्षक असल्याचेही पोलीस सूत्राने सांगितले. पोलीस सूत्रानुसार, इयत्ता ११ वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी सकाळी १० वाजताच्या सुमारास शाळेत जात होती. दरम्यान, शहरातील आरती चौकातील एका पेट्रोलपंप समोर नरेंद्र वसू हा इसम दुचाकीने तेथे आला. त्याने तिला आपल्या वाहनावर बसायला सांगितले. त्या मुलीने त्याला विरोध केला असता त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिला आपल्या राहत्या घरी नेले. तिथे त्याची पत्नी अंगणात होती. तिला संशय येताच ही मुलगी कोण असा सवाल पती नरेंद्रला केला. तेव्हा ती नातेवाईक असून स्वत:हून सोबत आल्याचे सांगितले. मात्र ती मुलगी रडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने आस्थेने विचारपूस केली असता तिने आपबिती सांगितली. त्या महिलेने तिच्याकडून तिच्या आईचा भ्रमणध्वनी घेऊन या घटनेबाबत अवगत केल्याने घटना उघडकीस आली. पीडिताच्या आईने मुलीला घेऊन वर्धा शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. त्या आरोपीच्या पत्नीने समयसुचकता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता अधिक तपास पोलीस करीत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)