शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील गोळ्यांनी विद्यार्थी आजारी

By admin | Updated: January 27, 2015 23:37 IST

वायगाव (नि.) येथील ठाकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत दिलेल्या गोळ्यांमुळे विद्यार्थ्याची प्रकृती खालावली़ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्याने विद्यार्थी बचावला़ या घटनेमुळे

वर्धा : वायगाव (नि.) येथील ठाकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत दिलेल्या गोळ्यांमुळे विद्यार्थ्याची प्रकृती खालावली़ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्याने विद्यार्थी बचावला़ या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली़ यापूर्वीही या आश्रम शाळेत असे प्रकार घडल्याने सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे़प्रजासत्ताक दिनी इयत्ता सातवीचा विद्यार्थी अभय अंकुश आत्राम हा आजारी झाला़ यामुळे त्याला शाळेतीलच गोळ्या देण्यात आल्या़ या गोळ्यांनी त्या विद्यार्थ्याची प्रकृती सुधारण्याऐवजी गंभीर झाली़ डोळे पांढरे करून त्याने झटके देण्यास सुरूवात केली़ यामुळे घाबरलेल्या शिक्षकांनी त्याच्या आई-वडिलांना सूचना दिली़ अंकूश आत्राम व त्यांच्या पत्नी डौलापूर येथून ३.३० वाजता शाळेत दाखल झाले़ यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले़ अभयची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरही घाबरले होते़ शर्थीचे प्रयत्न करून डॉक्टरांनी विद्यार्थ्याला वाचविले़ या घटनेबाबत वायगाव (नि.) येथील संबंधितांना माहिती दिली. यावरून मुख्याध्यापक रामदास डुकरे व शिक्षक रंगारी यांनी अंकूश आत्राम त्यांना शिवीगाळ केल्याचेही त्यांनी सांगितले़ मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाही़ यामुळे असे प्रकार नेहमीच घडत असल्याचे पालकांनी सांगितले़ काही दिवसांपूर्वी इयत्ता चवथीचा विद्यार्थी शुभम कोकाटे याची प्रकृती खराब झाली होती. त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे. शुभमची प्रकृती कशाने बिघडली, हे कळू शकले नाही़ मुख्याध्यापक डुकरे यांना विचारणा केली असता त्यांना बोलणे टाळले़(तालुका प्रतिनिधी)