शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मजबूत संघटन ही पक्षाची ताकद असून, संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांना पंचनामे सांगणारे दळभद्री हे सरकार असून, संघर्ष करा. राज्यात भाजपचे सरकार आल्याशिवाय शेतकऱ्यांचे तसेच महात्मा गांधींचे स्वप्नही पूर्ण होणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.  खा. तडस यांनी, अल्पमतातील नगर परिषद चालवणे कठीण आहे; परंतु संजय गाते यांनी किमया करून दाखविल्याचे सांगितले. भाजप-सेना युतीने दिलेला निधी महाविकास आघाडी सरकारने परत नेला.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : मजबूत संघटन ही पक्षाची ताकद असून, संघटन मजबुतीसाठी भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्याने प्रयत्न करावेत. आपण जनतेमध्ये ईश्वराचा अंश बघतो, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पुलगाव येथे विकासकामांचा लोकार्पण सोहळा व भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, प्रदेश सचिव राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस संजय गाते, पुलगावच्या नगराध्यक्षा शितल गाते, जि. प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, जि. प. सदस्य प्रवीण सावरकर, शहर अध्यक्ष नितीन बडगे, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र डांगे, रवींद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.  मुनगंटीवार पुढे म्हणाले, भाजपची सत्ता आल्याशिवाय अतिरिक्त तहसील होणार नाही. या मतदारसंघात काँग्रेसचे विसर्जन करून महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करावे. शेतकऱ्यांना पंचनामे सांगणारे दळभद्री हे सरकार असून, संघर्ष करा. राज्यात भाजपचे सरकार आल्याशिवाय शेतकऱ्यांचे तसेच महात्मा गांधींचे स्वप्नही पूर्ण होणार नाही, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.  खा. तडस यांनी, अल्पमतातील नगर परिषद चालवणे कठीण आहे; परंतु संजय गाते यांनी किमया करून दाखविल्याचे सांगितले. भाजप-सेना युतीने दिलेला निधी महाविकास आघाडी सरकारने परत नेला. तरीही ७० टक्के वचननाम्यातील कामे नगर परिषद पुलगावने पूर्ण केली, असे संजय गाते यांनी सांगितले.  मराठा, ओबीसी समाजाचा विश्वासघात करणारे महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारला धडा शिकवण्याची आज गरज आहे.  म्हणून विदर्भ मेळाव्यात जास्तीत जास्त ओबीसी समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी प्रदेश मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले. प्रास्ताविक नितीन बडगे यांनी केले. सूत्रसंचालन आकाश दुबे यांनी केले. आभार गजेंद्र गालपेल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला नितीन बडगे, मंगेश झाडे, राजू बत्रा, मानसिंग झांझोटे, भारत नागपाल, शिल्पा ठाकूर, संदीप बोरकुटे, मयूर निनावे, शकील खान, संगीता शहा, चंद्रकांत शहाकार, भरत नागपाल आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार