शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा रास्तारोको

By admin | Updated: August 14, 2014 23:51 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याकरिता निर्णय घेण्यात आला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. ुअशात शासनाने नव्याने आरक्षण मागणाऱ्या

आरक्षणाची मागणी : पवनारजवळ नागपूर मार्ग जामपवनार : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याकरिता निर्णय घेण्यात आला; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. ुअशात शासनाने नव्याने आरक्षण मागणाऱ्या समाजाकरिता तिसरी सूची जाहीर करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीतच आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली. ही मागणी पूर्ण करण्याकरिता गुरुवारी राज्यभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता पवनार येथे रास्ता रोको करण्यात आले. धनगर समाज संघर्ष कृती समितीच्यावतीने पवनार येथील बस स्थानकाजवळ चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची पूर्ण कल्पना पोलिसांना असल्याने बसस्थानक चौकात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत जवळपास दहा मिनिटे हे आंदोलन झाले. यामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आंदोलनादरम्यान भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४, १५, १६, २४४, ३३५, ३४२ व परिशिष्ट पाच नुसार धनगर, धनगड व ओरॉन या जमाती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. असे असताना महाराष्ट्र शासन सवलतींची अंमलबजावणी करण्याचे हेतुपुरस्पर टाळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या बाबत शासनानाला वेळोवेळी निवदेन दिली. तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी धनगर कृती समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू करण्यात आली. पहिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीकरिता साखळी आंदोलन झाले. नंतर मोर्चा काढत जिल्हाकचेरीत मेंढ्या नेण्यात आल्या. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारी पवनार येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समाज बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनापूर्वीच पोलीस ताफा तैनात असल्याने आंदोलनाला मोठे स्वरुप आले नाही. दहा मिनिटे चक्काजाम झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलीस बंदोबस्तामुळेच गावकऱ्यांना चक्काजाम होणार असल्याची माहिती मिळाली. चक्काजाम आंदोलन अतिशय शांततेने पार पडले. आंदोलनाचे नेतृत्व राजू गोरडे, हितेंद्र बोबडे, पुरूषोत्तम हुलके, श्रीधर लाभे, कृष्णा कुहीटे, गणेश हुगे, विनायक नन्नावरे, दिनकर तिनघसे, राजू बनकर, सिद्धार्थ खराबे यांनी केले. सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून मार्ग मोकळा केल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. (वार्ताहर)