शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-हैद्राबाद मार्गावर रास्ता रोको

By admin | Updated: June 20, 2014 00:00 IST

तालुक्यात रखडलेली विविध कामे पूर्ण करण्याच्या मागणीकरिता मनसेच्यावतीने गुरुवारी नागपूर-हैद्राबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वडनेरच्या बसस्थानकावरील हे आंदोलन दोन

मनसेच्या २५० कार्यकर्त्यांची अटक व सुटका : मार्ग दोन तास जामहिंगणघाट : तालुक्यात रखडलेली विविध कामे पूर्ण करण्याच्या मागणीकरिता मनसेच्यावतीने गुरुवारी नागपूर-हैद्राबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वडनेरच्या बसस्थानकावरील हे आंदोलन दोन तासांनी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. यावेळी मनसेच्या शेकडो कार्यकर्र्त्यांना अटक करून सुटका करण्यात आली.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ चे चौपदरीकरणाचे काम गत सात वर्षांपासून रखडले आहे. असे असताना या खराब रस्त्याचा टोल मात्र वसुल करण्यात येत आहे. या रस्त्याने काम २०१२ पर्यंत पूर्ण करायचे होते; मात्र ते काम पूर्ण झाले नसल्याने आता ते दुसऱ्या कंपनीकडे सोपविणार असल्याचे आंदोलकांना यावेळी सांगितले. शिवाय वडनेरच्या टोल नाक्यावर प्रवाशांची होणारी लुट लवकरच थांबविण्यात येईल व तेथील सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व ड्रेस देण्यात येईल व प्रवाशांच्या सेवेसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. हिंगणघाट समुद्रपूर सिंदी (रेल्वे)चे वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता वैद्य यांना भारनियमनाबाबत माहिती देवून शेतकऱ्यांना पूर्ण वेळ विजपुरवठा सुरळीत सुळ ठेवावा अन्यथा यापेक्षाही शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी देताच वैद्य यांनी आपली तक्रार वरिष्ठांकडे पाठविल व भारनियमन कमी करू असे आश्वासन दिले. सोबतच वडनेर-आजनसरा रस्त्याच्या डांबरीकरणाकरिता ६.६५ करोड रुपये मंजूर असून हे काम लवकरात लवकर मार्गी लावू, त्याच बरोबर हिंगणघाट पारडी (नगाजी) मार्गावरील पहाडी नाल्यावरील पुलासाठी १.६५ लाख रुपये मंजूर असून रस्त्याच्या कामसाठी २ करोड ५५ लाख रूपये मंजूर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वानखेडे यांनी सांगितले.आंदोलनात हिंगणघाट समुद्रपूर गिरड येथील कार्यकर्ते सहभागी होते. यावेळी हिंगणघाट समुद्रपूर, गिरड ठाण्यातून जादा पोलिसांची कुमक बोलाविण्यात आली होती. या आंदोलकांना नायब तहसीलदार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलवार, ठाणेदार दोडके, अहेरकर यांनी भेट दिली. पोलिसांनी यावेळी मुबई पोलीस कायद्याच्या २६८ अन्वये २५० कार्यकर्त्यांना कलम ६९ अन्वये अटक करून सुटका केली. या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, उपजिल्हाध्यक्ष अमोल बोरकर, बाबाराव कलोडे, सुनील भुते, जयंता तिजारे, प्रवीण श्रीवास्तव, विजू तडस, वासुदेव वैरागडे, हिरासिंग अकाली, यांच्यासह हजारो कार्यकर्ते व महिला आंदोलनात सहभाग झाल्या होत्या.(तालुका प्रतिनिधी)