शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 05:00 IST

सन २०१८ पूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा जिल्हा परिषद करायची. परंतु, त्यानंतर पथदिव्यांचे देयक अदा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे देण्यात आली. २०१८ पूर्वी व नंतर वेळोवेळी पथदिव्यांचे विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सध्या ग्रामपंचायतींवर विद्युत देयकाची मोठी थकबाकी आहे.

ठळक मुद्देसंतप्त सरपंचांचे आंदोलन : ठोस आश्वासनाअंती घेतली माघार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थकबाकीचे कारण पुढे करून महावितरणने वर्धा शहराशेजारील सुमारे ३३ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने या गावांमध्ये शुक्रवारी काळोखाचे सामाज्य होते. खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी सरपंचांनी एकत्र येत महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनाअंती आंदोलन मागे घेतले.सन २०१८ पूर्वीपर्यंत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांच्या विद्युत देयकाचा भरणा जिल्हा परिषद करायची. परंतु, त्यानंतर पथदिव्यांचे देयक अदा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे देण्यात आली. २०१८ पूर्वी व नंतर वेळोवेळी पथदिव्यांचे विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सध्या ग्रामपंचायतींवर विद्युत देयकाची मोठी थकबाकी आहे. हीच थकबाकी वेळीच न अदा केल्याचे कारण पुढे करून महावितरणने शुक्रवारी वर्धा शहराशेजारील १३ तसेच तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला. पथदिव्यांचा विद्युत पुरवठा अचानक खंडित केल्याने गावांमध्ये काळोख पसरला होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. नागरिकांच्या अडचण लक्षात घेता, सरपंचांनी एकत्र येत सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण, तेथे समाधान न झाल्याने आंदोलक सरपंचांनी थेट महावितरणचे अधीक्षक अभियंता कार्यालय गाठून कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे यांच्या दालनात ठिय्या दिला. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात वर्धा पंचायत समितीचे सभापती महेश आगे, जिल्हा परिषद सदस्य नूतन राऊत, बाळकृष्ण माऊसकर, पिपरी (मेघे)चे सरंपच अजय गौळकर, साटोडाचे सरपंच अजय जानवे, महाकाळचे सरपंच सुरेश गोहो, इंझापूरचे सरपंच दीपक तपासे, सिंदी (मेघे) च्या सरपंच प्रीती सवाई, म्हसाळ्याचे उपसरपंच संदेश किटे, उमरी (मेघे)चे सरपंच सचिन खोसे, बोरगाव (मेघे)चे सरपंच संतोष सेलूकर, ग्रामपंचायत सदस्य वंदना झामरे, कांता भगत, शारदा बावणे,  आदी सहभागी झाले होते.

२०१८ नंतरच्या थकबाकीपैकी ३ टक्के रक्कम ३० दिवसांत महावितरणचे कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे यांच्या दालनात झालेल्या सकारात्मक चर्चेदरम्यान २०१८ नंतरच्या थकबाकीपैकी ३ टक्के रक्कम ३० दिवसांच्या आत अदा करण्यात येईल, असा निर्णय घेत तातडीने खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी एकमुखाने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे रेटण्यात आली. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही सहानुभूतीपूर्वक विचार केल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज