शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

गृहरक्षकांच्या राज्यव्यापी आंदोलनाला प्रारंभ

By admin | Updated: July 17, 2016 00:26 IST

होमगार्ड म्हणून गत १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहे.

शहरातून मोर्चा : वर्धेसह इतर जिल्ह्यातील गृहरक्षकांचा सहभाग वर्धा : होमगार्ड म्हणून गत १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे आदेश राज्य शासनाने निर्गमित केले आहे. हा आदेश रद्द करण्याची मागणी होमगार्डच्यावतीने करण्यात आली होती. मात्र यावर शासनाच्यावतीने कुठलीही निर्णय घेण्यात आला नसल्याने गृहरक्षकांनी दिलेल्या निवेदनानुसार शनिवारपासून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून राज्यव्यापी आंदोलनाला प्रारंभ केला आहे. बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्या पुढाकारत होत असलेल्या या आंदोलनात वर्धेसह इतर जिल्ह्यातील गृहरक्षकही सहभागी झाले आहेत. तत्पूर्वी शहरात शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली. शनिवारपासून सुरू झालेल्या या आंदोलनात वर्धेतील ५२२ आंदोलकांनी सहभाग घेतला आहे. याशिवाय चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती व अकोला येथील गृहरक्षक सहभागी झाल्याचे बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे. या संदर्भात आयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मागण्यांची माहिती दिली. राज्यात १९४७ पासून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गृहरक्षक कार्यरत आहेत. राज्यभर पोलीस विभागातील पदे रिक्त असताना तुटपुंज्या मानधनावर गृहरक्षकांकडून काम करून घेण्यात येत आहे. यातही गृहरक्षकाकडून कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाही. असे असताना राज्य शसनाच्यावतीने एक आद्यादेश काढत १२ वर्ष सेवा झालेल्या गृहरक्षकांना सेवेतून कमी करण्याचे फरमान सोडले. शासनाने घेतलेला हा निर्णय मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ व १९५३ मधील तरतुदीनुसार नसल्याचा आरोप बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने करण्यात आला आहे. हा निर्णय जर कायद्याच्या अनुरूप असता तर तो मान्य केला असता, असेही फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले. या संदर्भात फेडरेशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मात्र त्यांच्याकडून या संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने वर्धेतून आंदोलनला प्रारंभ करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)