शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
3
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
4
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
5
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
6
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
7
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
8
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
9
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
10
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
11
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
12
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
13
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
14
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
15
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
16
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
17
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
18
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
19
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
20
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 

नव्या बदलांसह सलून व्यवसाय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात जवळपास दोन हजारांवर सलून दुकाने असून ८० ते ९० टक्के लघु व्यावसायिक आहेत. या व्यवसायावरच व्यावसायिकांसह कुटुंबाचे पोट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने २२ मार्चपासून तब्बल दोन महिने सलून व्यवसाय पूर्णत: ठप्प होता. नियमित व्यवसायाबरोबरच दशक्रिया, गंधमुक्ती, जावळे आदी कार्यक्रमदेखील बंद असल्याने उत्पन्नाचे स्रोतच थांबले होते.

ठळक मुद्देसुरक्षेच्या दृष्टिकोनातून हॅण्डग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझरसह साहित्याचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मागील दोन महिन्यांपासून सलून व्यवसाय ठप्प पडला होता. गुरुवारपासून सलून व्यवसाय सुरू करण्यास शासन-प्रशासनाने परवानगी दिली. सुरक्षितता म्हणून व्यावसायिकांकडून हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर, डिस्पोझेबल कटिंग शीटसह टॉवेलचा वापर केला जात आहे.जिल्ह्यात जवळपास दोन हजारांवर सलून दुकाने असून ८० ते ९० टक्के लघु व्यावसायिक आहेत. या व्यवसायावरच व्यावसायिकांसह कुटुंबाचे पोट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने २२ मार्चपासून तब्बल दोन महिने सलून व्यवसाय पूर्णत: ठप्प होता. नियमित व्यवसायाबरोबरच दशक्रिया, गंधमुक्ती, जावळे आदी कार्यक्रमदेखील बंद असल्याने उत्पन्नाचे स्रोतच थांबले होते. अनेक सलून व्यावसायिकांची दुकाने भाडे तत्त्वावर तर काहींची बँकांतून कर्ज काढून गाळे खरेदी केले आहेत. त्यामुळे दुकानाचे भाडे तसेच कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा यक्षप्रश्न उभा ठाकला होता. सोबतच कारागिरांची देणी कशी द्यायची प्रश्नदेखील भेडसावत होता.एकट्या वर्धा शहरात ३५० वर सलून दुकाने असून कारागिरांची संख्याही मोठी आहे. व्यवसायच ठप्प असल्याने व्यावसायिकांसह कारागिरांवर मोठे संकट ओढवले होते. गुरुवारपासून जिल्हा प्रशासनाने सलून दुकाने सुरू करण्यास हिरवी झेंडी दिली. व्यवसाय करताना व्यावसायिकांकडून सुरक्षेच्या दृष्टीने पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर, डिस्पोझेबल कटिंग शीट, नवे टॉवेल आदींचा वापर व्यावसायिक करीत आहेत. याकरिता ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत. सुरक्षेची बाब म्हणून ग्राहकही पैसे देत आहेत.संपूर्ण जिल्ह्यात दोन हजारांवर दुकानेएकट्या वर्धा शहरासह जिल्हाभरात दोन हजारांवर सलून दुकाने आहेत. या व्यवसायावरच ५ ते ६ हजार कारागीर, व्यावसायिकांची उपजीविका चालते. जिल्हा प्रशासनाने पालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सलून दुकाने गुरुवार शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस तर ग्रामीण भागातील व्यवसाय सातही दिवस सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.कटिंग, दाढीचे भाव वधारलेतकोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नव्या बदलांसह आता सलून व्यवसाय केला जात असल्याने व्यावसायिकांनी कटिंग आणि दाढीचे भाव वाढविले आहेत. पूर्वीच्या दरात या संकटकाळात ग्राहकांना सुविधा देणे अवघड बाब आहे. याकरिता कटिंगकरिता आता ६० रुपयांवरून १०० तर दाढीसाठी ४० रुपयांवरून ६० रुपये आकारले जात आहेत.मोबाईलवरूनच बुकिंगदुकानात होणारी गर्दी टाळण्याकरिता मोबाईवरून कटिंग-दाढीकरिता बुकिंग केले जात आहे. ग्राहकांच्या सुविधकेरिता सलून व्यावसायिकांनी मोबाईल क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. ग्राहक संपर्क करून व्यावसायिकाकडून वेळ घेत आहेत. यात ग्राहकांची गैरसोय टळत आहे.दुकानाबाहेर झळकताहेत फलकशहरासह संपूर्ण जिल्ह्यातील सलून दुकानांच्या दर्शनी भागावर सुरक्षेच्या अनुषंगाने फलक लावण्यात आले आहेत. यात ग्राहकांना विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत.कोरोना विषाणू संक्रमण रोखण्याकरिता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच उपाययोजना केल्या जात आहेत. शासन-प्रशासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. व्यावसायिकांसोबतच ग्राहकांनी सहकार्य करावे.लीलाधर येऊलकर, अध्यक्ष, जिल्हा सलून असोसिएशन, वर्धा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय