शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांपासून रेल्वे पूल अपूर्णच

By admin | Updated: December 30, 2016 00:29 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ येथील रेल्वे गेट क्रमांक १४ चे काम सुरू झाले. त्या कामाला २०१० पासून ब्रेक बसला.

दररोज तासनतास वाहनांच्या रांगा : शासनाचे लेखी आश्वासन हवेतच विरले हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ येथील रेल्वे गेट क्रमांक १४ चे काम सुरू झाले. त्या कामाला २०१० पासून ब्रेक बसला. या काळात रखडलेले काम अद्यापही पूर्ण झाले नाही. हा मार्ग अतिशय वर्दळीचा असून येथे दररोज वाहनाच्या रांगा असतात. सदर काम पूर्ण करण्याकरिता येथील नागरिकांनी शासनाला निवेदन देत अनेक वेळा आंदोलने केली. यावेळी सदर पुलाचे काम मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र हे लेखी आश्वासन हवेतच विरले. यामुळे गुरुवारी येथील संतप्त नागरिकांनी पुन्हा रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रेल्वे पुलाचे काम गत अनेक वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. सन २०१० मध्ये या पुलाच्या व रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. संपूर्ण काम अद्यापही पुर्णत्वाला आले नाही. याबाबत नागरिकांना बरेच वेळा निवेदन दिले होते. त्यावेळी रेल्वे कार्यालयाने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. हे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसते. त्यानंतर नागरिकांनी पुन्हा २१ जानेवारी २०१६ रोजी निवेदन दिले. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने ३१ मार्च २०१६ पर्यंत काम पूर्ण होईल असे कळविले होते. तरीही या मार्गाचे काम पूर्ण झाले नाही. परिणामी मे २०१६ मध्ये नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देत ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत काम पूर्ण होईल असे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते; परंतु डिसेंबर २०१६ संपत असून अद्यापही पुलाचे काम अर्धवटच आहे. या कारणामुळे राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गाड्या, आम नागरिक, शेतकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गेटवर ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. येथून सेवाग्राम व सावंगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना याचा त्रास होत आहे. यापूर्वी याच उडाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे अपघात सुद्धा झाले आहे. वेळोवेळी रेल्वे फाटक बंद होत असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागत होत्या. यामुळे आम नागरिकांना व प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला होता. अधिकाऱ्यांना निवेदन देताना मनोज उपासने, जगदीश प्रसाद शुक्ला, प्रमोद जुमडे, अखिल धाबर्डे, विनोद कुंभारे, भाऊराव कोटकर, अ‍ॅड. अनिता जोशी, संदेश थुल, राकेश नगरवार, विजय मोहता, संजय हावगे, अजय देवढे, नरेंद्र चुबंडे, राजू अरगुले, भारत पवार यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)