शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

वाहन लुटणारे सहा जण जेरबंद

By admin | Updated: June 3, 2017 00:35 IST

रस्त्याने जात असलेले वाहन अडवून चालकाला मारहाण करून साहित्यासह वाहन पळविणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली.

५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : रस्त्याने जात असलेले वाहन अडवून चालकाला मारहाण करून साहित्यासह वाहन पळविणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली. ही घटना आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत धडली होती. अटक करण्यात आलेले सहाही आरोपी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील असून त्यांच्याकडून चोरीतील ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाज जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री केली. अब्दुल साजिद अब्दुल हबीब (३४) रा. गुजरी बाजार, मोहम्मद जावेद मोहम्मद रशीद (२९), मोहम्मद शफिक मोहम्मद रशीद (३५), इमरान खान शरफुद्दीन खान (३०) तिघेही रा. माळीपुरा, नसीम खान जाबाज खान (२२) व शेख वसीम शेख रहीम(२०) रा. इस्लामपुरा, मोर्शी लि. अमरावती अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सुत्रानुसार, गणेश माहुलकर रा. चांदुर रेल्वे, जि. अमरावती हे त्यांच्या वाहनाने काही साहित्य घेवून जात असताना अनोळखी इसमांनी त्यांचे वाहन अडवून मारहाण करीत लुटमार केली. यात चोरट्यांनी रोख ३० हजार ५०० रुपये व एम.एच.२७ एक्स ७५४० क्रमांकाचे वाहन असा ३ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. याप्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला असता त्यांनी सहा जणांना संशीत म्हणून ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन चारचाकी गाड्या, ९ मोबाईल, नगदी ३० हजार व गुन्ह्यातील चोरुन नेलेले साहित्य असा एकूण ५ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. व अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पराग पोटे, उपनिरीक्षक अचल मलकापुरे, पोलीस कर्मचारी परवेज खान, नरेंद्र डहाके, दिवाकर परिमळ, आनंद भस्मे, सचिन खैरकार, अमर लाखे, समीर कडवे, तुषार भुते, जगदीश डफ, मुकेश येल्ले यांनी केली. मित्रानेच केला घात या लुटमारीच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात याची माहिती उघड झाली आहे. या गुन्ह्यात असलेल्या आरोपींना फिर्यादीच्या मित्रानेच सूचना केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या सूचनेरूनच पांढुर्णा येथून पाठलाग करून आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धाडी शिवारामध्ये लुटमार केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.