शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात रंगला नामसंकीर्तन सोहळा

By admin | Updated: December 28, 2016 00:50 IST

बुरांडे ले-आऊट, वरूड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान अखंड हरिनाम व नामसंकीर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत रंगला.

सेवाग्राम : बुरांडे ले-आऊट, वरूड येथील श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थान अखंड हरिनाम व नामसंकीर्तन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत रंगला. यात विविध धार्मिक कार्यक्रमासह भजन, देवजागर, कीर्तन, भारूड व पालखी सोहळा असे कार्यक्रम झाले. शुक्रवारी माया रोकडे तांच्या हस्ते कलशस्थापना करुन उत्सवाचा प्रारंभ केला. यानंतर एकादशीला मुर्तीची महापूजा अतुल तुपकर यांच्या हस्ते करण्यात आली. यासह काकडा, भजन, सकाळी व रात्री आरती, हरिपाठ तसेच राष्ट्रीय कीर्तनकार भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम झाला. शनिवारी सामुदायिक कीर्तन झाले. प्रशांत महाराज चलाख यांनी मार्गदर्शन केले. तसेच रविवारी राहूल महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर परिसरातून पालखीसह दिंडी काढण्यात आली. यात भजनी मंडळीच्या साथीने नागरिक सहभागी झाले होते. भजन मंडळी, करंजी (भोगे), भजन मंडळी सोहमनगर, भजन मंडळ पहेलानपूर व खापरी (ढोणे), यासह बापुनगर, टेलीकॉमनगर, डॉक्टर कॉलनी, म्हाडा कॉलनी, वरूड रेल्वे जूनी वस्ती येथील भजनी मंडळी सहभागी झाली होती. ठिकठिकाणी श्रींच्या पालखीचे भाविकांनी आरती ओवाळून स्वागत केले. महिला भगिनींनी घरासमोर रांगोळी काढून परिसर सुशोभित केला होता. पालखी सोहळ्यानंतर दहिहांडी कार्यक्रम राहुल महाराज हजारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरणात पाहायला मिळाले. गावकरी व महिलांचा यात सहभाग होता. दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जाते. महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी) श्रीमद भागवत कथा सप्ताहात प्रवचन सेवाग्राम : जुन्या वस्तीतील श्री हनुमान मंदिर देवस्थान येथे अखंड ज्ञानयज्ञ संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह सुरू आहे. यात कथा प्रवचन आयोजित करण्यात आले. भाविकांनी श्रीमद भागवत ग्रंथाचे पूजन केले. आरती झाल्यानंतर रात्रीला हवन व पुजन झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. कथा प्रवक्ता केशवस्वामी सारंग चैत्यन्य महाराज, (अमरावती) आहे. भारतीय संस्कृती व परंपराचे ज्ञान शिक्षणासोबत गुरूकुलात विद्यार्थ्यांना दिले जात असे. आजही अशाच शिक्षणासाठी विद्यार्थी माधुकरी मागून आपले शिक्षण पूर्ण करतात. अन्नाला आपण पूर्णब्रम्ह असे म्हणतो. ज्यात माधुर्य आहे आणि देणारा किंवा देणारी सहृदयी आहे. त्याचा लाभ दोघांनाही होतो. त्या भोजनाच गोडवा काही औरच असतो. भगवंतासाठी गरीब सुध्दा पोहे नेतो. भगवंत ते आवडीने खातात. यातून मैत्री आपल्याला दिसून येते. खऱ्या मैत्रीभावात गरीब श्रीमंत अशी भावना नसते. भारतात वर्णव्यवस्था होती. पण आपण समदृष्टीच्या भावनेने सर्वांशी जुळलो आहे. धर्म, संस्कृतीचे विस्मरणाने नैतिकतेचे पतन आहे. त्यामुळे मन सुन्न करणाऱ्या घटना समाजात होताना दिसतात. भगवंताला शरण जात मर्यादेत जीवन जगावे.