शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण यांच्यावर कोसळले आभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:36 IST

एकीकडे मुलाची शस्त्रक्रिया दुसरीकडे पत्नीला कॅन्सर. घरात पैसाअदला नाही. पत्नी व मुलाच्या आजारामुळे फडे बनवून विकण्याचा व्यवसाय बंद झाला. तरी श्रावणने धीर सोडला नाही. यातच श्रावणला कुणी तरी प्रहारसंदर्भात माहिती दिली.

ठळक मुद्देमुलाला हृदयरोग, पत्नीला कर्करोग । प्रहारने दिला मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : एकीकडे मुलाची शस्त्रक्रिया दुसरीकडे पत्नीला कॅन्सर. घरात पैसाअदला नाही. पत्नी व मुलाच्या आजारामुळे फडे बनवून विकण्याचा व्यवसाय बंद झाला. तरी श्रावणने धीर सोडला नाही. यातच श्रावणला कुणी तरी प्रहारसंदर्भात माहिती दिली. आठवडाभरापूर्वी रुग्णमित्राला माहिती दिली आणि मुलाच्या शस्त्रक्रियेचा मार्ग सुकर झाला.शहरातील संत तुकडोजी वॉर्डात मूकबधिर शाळेच्या मागील बाजूस खुल्या जागेवर झोपडी बांधून, फडे तयार करून पत्नी व दोन मुले अशा परिवाराचे पालनपोषण करणाऱ्या श्रावण कांबळे याची कर्मकहाणी.श्रावण यांचा मोठा मुलगा दहावीला शिकतो तर लहान आठवीला. सहा महिन्यांपूर्वी लहान मुलगा सुमितला छातीचा त्रास होत असल्याने हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखविले. हृदयरोगाचे लक्षण जाणवल्याने त्याला सावंगी रुग्णालयात दाखविण्याचा सल्ला दिला. सावंगी रुग्णालयात दाखविले असता त्याला हृदयाचा आजार असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देत अडीच लाख रुपये खर्च सांगितला. शस्त्रक्रियेकरिता लागणाºया रकमेची जुळवाजुळव करण्यासाठी श्रावणने धावपळ केली. परंतु पदरी निराशाच पडली.मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी धावपळ करतानाच पत्नीची प्रकृती बिघडली. पत्नीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पत्नीला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. सेवाग्राम रुग्णालयात भरती केले असता तेथील डॉक्टरांनी पत्नीला कॅन्सर असल्याचे सांगितले. आता श्रावण कांबळे यांच्यासमोर दु:खाचा डोंगर उभा झाला. एकीकडे मुलाची शस्त्रक्रिया दुसरीकडे पत्नीला कॅन्सर. पत्नी व मुलाच्या आजारामुळे फडे बनवून विकण्याचा व्यवसाय बंद झाला. तरी श्रावणने धीर सोडला नाही.श्रावण यांना प्रहारसंदर्भात माहिती दिली. त्यांनी गजू कुबडे यांना आपबिती सांगितली. त्याच सायंकाळी कुबडे यांनी श्रावण कांबळेंचे घर गाठले. मदतीचा हात देत मुलाच्या शस्त्रक्रियेची नागपूर येथे एका नामांकित रुग्णालयात व्यवस्था करून दिली. पुढील आठवड्यात मुलाला भरती करून मुलगा सुमितवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. पत्नीला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात भरती करून योजनेच्या माध्यमातून उपचार सुरू केले. प्रहारने काही आर्थिक मदतदेखील केली. मात्र, दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करायची असल्याने मदतीचे आवाहन