वर्धा : घरी आंघेळ करीत असलेल्या महिलेवर बळजबरी करणाऱ्या भारत कांबळे रा. पवनार याला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सोबतच पीडित महिलेला नुकान भरपाई देण्याचेही म्हटले आहे. सदर निकाल येथील सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी गुरुवारी दिला. या बाबत थोडक्यात वृत्त असे की, पीडित महिला तिच्या घरी आंघोळ करीत असताना शेजारी भारत कांबळे (५१) रा. पवनार याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने संपूर्ण घटना तिच्या पतीला सांगितली. यावरून सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनुसार तपास करून पीएसआय तोटेवार यांनी भारतविरूद्ध भादंविच्या कलम ३७६, ४४८ अन्वये गुन्हा नोंदवून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.प्रकरण साक्षीकरिता न्यायाधीश कंकणवाडी यांच्या न्यायालयात आले असता शासनातर्फे सहायक शासकीय अभियोक्ता श्याम दुबे यांनी पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. यावरून भारत कांबळेला कलम ३७६ अन्वये सात वर्षे सक्त मजुरी १ हजार रुपये दंड तसेच कलम ४८८ भादंवि अन्वये सहा महिने शिक्षा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवसांची शिक्षा ठोठावली. पीडितास कलम ३५७ अ अन्वये मोबदला देण्यास यावा असे जाहीर केले.(कार्यालय प्रतिनिधी)
बलात्कारप्रकरणी आरोपीला सात वर्षांची शिक्षा
By admin | Updated: May 8, 2015 01:49 IST