शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांनी चालण्यातून दिला सुदृढ आरोग्याचा मंत्र

By admin | Updated: December 29, 2016 00:53 IST

जिल्हा मास्टर्स अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्यावतीने प्रौढ महिला व पुरूषांकरिता ‘चालाल तर वाचाल’ ही स्पर्धा घेण्यात येते.

चालाल तर वाचाल’ स्पर्धा : प्रौढ महिला आणि पुरूषांसह ३२० स्पर्धकांचा सहभाग वर्धा : जिल्हा मास्टर्स अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्यावतीने प्रौढ महिला व पुरूषांकरिता ‘चालाल तर वाचाल’ ही स्पर्धा घेण्यात येते. यंदा या स्पर्धेत ३६ ते ७१ वर्षे वयोगटात ३२० स्पर्धकांनी सहभाग घेत चालण्यातून सुदृढ आरोग्याचा मंत्र दिला. ३, ४ व ५ किमी अंतरासाठी विविध वयोगटात सदर स्पर्धा घेण्यात आली. महात्मा गांधी पुतळा येथून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. यातील स्पर्धकांनी वयोगटानुसार अंतर पूर्ण केले. विजेच्या स्पर्धकांना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदक प्रदान करण्यात आले. मंचावर नगराध्यक्ष अतुल तराळे, पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर, व्यावसायिक गोविंद राठी, लॉयन्स क्लबचे प्रदीप दाते, मुरलीधर फाले, गिरीष उपाध्याय, प्रा. किशोर पोफळी, प्रा. प्रभाकर भोगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. महिलांच्या ३६ वर्षे वयोगटात डॉ. अभिलाषा यादव यांना सुवर्ण, शुभांगी गोतमारे यांना रजत तर पुष्पा तपासे यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आले. ४१ वर्षे गटात संघमित्रा शेळके यांना सुवर्ण तर रजत पदक शशिकांती शर्मा व कांस्य पदक प्रतिभा उके यांनी पटकाविले. ४६ वर्षे वयोगटात संध्या ठोकळे यांना सुवर्ण, डॉ. सुरेखा तायडे यांना रजत तर मनीषा साळवे यांना कांस्य पदक देण्यात आले. ५१ वर्षे वयोगटात रेखा वर्मा यांना सुवर्ण, रेखा दर्डा यांना रजत तर विभा निकडे यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आले. यासह ६१ वर्षे वयोगटात अनिता यादव यांना सुवर्ण, विमल वाघ यांनी रजत आणि सुष्मीता अलोणे यांना कांस्य पदक प्रदान करण्यात आले. पुरूषांच्या विभागात ४१ वर्षे वयोगटात नितीन राऊत यांना सुवर्ण, महेश साबळे यांना रजत तर कांस्य पदक अतुल तुपकर यांना मिळाले. ४६ वर्षे गटात जयंत हागोणे यांनी सुवर्ण, नितीन पांडे यांनी रजत तर गोविंद राठी यांनी कांस्य पदक मिळविले. ५१ वर्षे गटात सुनील वाघ सुवर्ण तर हरिष त्रिवेदी यांना रजत आणि सलीम कुरेशी यांना कांस्य पदक मिळाले. ५६ वर्षे वयोगटात अशोक कावरे यांना सुवर्ण, श्रीधर राऊत यांना रजत तर अनिल कांबळे यांना कांस्य पदक प्रदान केले. ६१ वर्षे वयोगटात भीमराव केने यांनी सुवर्ण पदक पटकाविले. ओमप्रकाश यादव यांनी रजत तर काका जीवणे यांनी कांस्य पदकाची कमाई केली. ७१ वर्षे वयोगटात उत्तमराव फरताडे यांना सुवर्ण, सुरेश इंगोले यांनी रजत पदक तर विठ्ठल केवटे यांनी कांस्य पदकाची कमाई केली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध संघटनेच्या सदस्य तथा नागरिकांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)