शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सेलू तालुका क्रीडांगण सदोष

By admin | Updated: October 12, 2015 02:20 IST

ग्रामीण भागातून गुणवंत खेळाडू तयार व्हावे याकरिता शासनाकडून विविध प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यात येतात.

उद्देशाला हरताळ : बांधकाम विभागाला बजावली नोटीसश्रेया केने  वर्धाग्रामीण भागातून गुणवंत खेळाडू तयार व्हावे याकरिता शासनाकडून विविध प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यात येतात. परंतु प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या अंमलबजावणीत कुचराई होत असल्याने उद्देशालाच हरताळ फासल्याचे सेलू येथे उजेडात आले आहे. सेलूच्या तालुका क्रीडा संकुलातील मैदानाचे बांधकाम सदोष पद्धतीने झाल्याचे पाहणीत दिसून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुलाचे केवळ देवळी, सेलू तालुक्यातील बांधकाम पूर्ण झाले आहे तर इतर ठिकाणी काम सुरू आहे. जिल्ह्यातील क्रीडा संकुलाचे बांधकाम व देखभाल करण्याकरिता राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. क्रीडा संकुलातील धावपट्टी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो ही मैदाने बांधताना ते अंतरानुसार बनविण्यात आलेले नाही. यापूर्वी आमदार, जिल्हाधिकारी यांनी मैदानांची पाहणी करताना नियमानुसार मैदानाचे बांधकाम केली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. तसेच बांधकाम विभागाला सदर मैदानाचे बांधकाम मोजमापात करावे असे निर्देश दिले होते. यानंतरच संकुल हस्तांतरित करण्याचे पत्र देण्यात आले. संकुलाचे हस्तांतरण करण्यापूर्वी विभागीय उपसंचलक व क्रीडा अधिकारी यांनी पुनर्पाहणी केली असता मैदान तयार करताना कोणत्याच सुधारणा केल्या नसल्याचे समोर आले. मैदानाच्या अंतराचे मोजमाप केले असता नियोजित क्षेत्रफळ आणि अंतरापेक्षा तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारच्या मैदानावर खेळाचे प्रदर्शन केल्यास खेळाडूंच्या कामगिरीवर याचा निश्चितच विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून सूचनांचे पालन होते अथवा नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखविली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.