लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विना परवाना झुडपी जंगल परिसरात अवैध उत्खन्न करून रेतीची वाहतूक करण्यारा ट्रॅक्टर आणि विना परवानगी वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक करणारा एक मालवाहू असा एकूण लाखोंचा मुद्देमाल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.मौजा कळजणा शिवारातील झुडपी जंगलाच्या शेजारी असलेल्या नाल्यातून अवैध उत्खनन रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाकेबंदी करून एम.एच ३२ ए. २५०१ क्रमांकाचा ट्रॅक्टर अडवून आवश्यक कागदपत्रांची विचारणा केली असता ते चालकाजवळ आढळून आले नाही. अधिक विचारपूस करताना सदर रेती झुडपी जंगल परिसरातून अवैधपणे उत्खनन करून तिची वाहतूक केल्या जात असल्याचे पुढे आले. परिणामी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सदर रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त केला. शिवाय ट्रॅक्टर मालक अमित साहू रा. हिंगणघाट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरी कारवाई वायगाव (नि.) चौकात करण्यात आली. एका मालवाहूतून मोठ्या प्रमाणात लाकडाची वाहतूक केल्या जात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच सदर मालवाहूचा पाठलाग करून तो अडविण्यात आला. आवश्यक कागदपत्रांची विचारणा केल्यावर ते नसल्याचे पुढे आल्याने एम.एच. ३२ क्यू. ६४०५ क्रमांकाचा लाकुड भरलेला मालवाहू वन विभागच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. या प्रकरणी कानगाव येथील पुरुषोत्तम झाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वर्धा वन परिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, एस. आर. परडक्के, यु. व्ही. शिरपूरकर, विनोद सोनवणे, जाकीर शेख आदींनी केली.
दोन मालवाहू वाहनांसह रेती व लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:52 IST
विना परवाना झुडपी जंगल परिसरात अवैध उत्खन्न करून रेतीची वाहतूक करण्यारा ट्रॅक्टर आणि विना परवानगी वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक करणारा एक मालवाहू असा एकूण लाखोंचा मुद्देमाल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.
दोन मालवाहू वाहनांसह रेती व लाकूड जप्त
ठळक मुद्देवन विभागाची कारवाई : विना परवानगी केली जात होती वाहतूक