शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सावंगीसह सेवाग्रामात कोविड युनिटची सुरक्षा टाईटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:30 IST

वर्धा जिल्ह्यातील या दोन्ही कोविड रुग्णालयात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णाशिवाय कुणालाही या कोविड युनिट मध्ये प्रवेश दिला जात नाही. रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या रुग्णाला तालुका स्तरावरील रुग्णालयात दाखल केले जाते. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णाला तेथून शासकीय व नेमूण दिलेल्या रुग्णवाहिकेतून संबंधित कोविड रुग्णालयात पाठविले जाते.

ठळक मुद्देनातेवाईकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर : आतमध्ये रुग्णांजवळ कुणालाही प्रवेश नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा १७ हजाराच्या वर पोहचला आहे. कोरोनाची एन्ट्री होताच जिल्हा प्रशासनाने सावंगी येथील आचार्य विनोबा भावे तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित केले. या दोन्ही ठिकाणी वर्ष भरापासून कोविड युनिट आहे. या दोन्ही ठिकाणच्या सुरक्षेबाबत लोकमतने रिॲलिटी चेक केला असता सुरक्षा अतिशय चोख असल्याचे दिसून आले.वर्धा जिल्ह्यातील या दोन्ही कोविड रुग्णालयात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णाशिवाय कुणालाही या कोविड युनिट मध्ये प्रवेश दिला जात नाही. रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या रुग्णाला तालुका स्तरावरील रुग्णालयात दाखल केले जाते. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णाला तेथून शासकीय व नेमूण दिलेल्या रुग्णवाहिकेतून संबंधित कोविड रुग्णालयात पाठविले जाते. त्यावेळी रुग्ण व आरोग्य कर्मचारीच सोबत असतो. रुग्णालयातही त्याला दाखल केल्यानंतर कुणालाही येथे प्रवेश दिला जात नाही. जिल्हा प्रशासनाने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या संपर्कासाठी कंट्रोल रूम तयार केली असून या रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांचे क्रमांक तेथे नमूद करण्यात आले आहे. भ्रमणध्वनीवरून रुग्णाची माहिती नातेवाईक त्यांच्याकडून घेवू शकतात. याव्यतिरिक्त कुणालाही तेथे प्रवेश नाहीच. 

तज्ञ डॅाक्टरसह कर्मचारी उपस्थितकस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे जुन्या इमारतीच्या मागील  बाजूस कोविड युनिट सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पुरेसे कर्मचारी व डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना वेळोवेळी माहिती दिली जाते.

कोविड केंद्र परिसरात सुरक्षेचे कवचसावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात कोविड युनिट सुरू करण्यात आले आहे. येथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. कुणालाही प्रवेश दिला जात नाही. बाहेरच सुरक्षा रक्षक नागरिक व नातेवाईकांना थांबवितात.

सध्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या नातेवाईकांना संपर्काकरिता जिल्ह्यातील तीन रुग्णालयाच्या कंट्रोल रूमचे क्रमांक देण्यात आले आहे. येथील नोडल अधिकारी यांचेही संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहे.- डॅा. सचिन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल