शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी ठोकणार शाळेला कुलूप

By admin | Updated: June 26, 2016 01:58 IST

तालुक्यातील धामकुंड येथील जिल्हा परिषद शाळेला सतत एक वर्षापासून मागणी करूनही शिक्षण विभागाने शिक्षक दिला नाही.

पालक संतप्त : मागणी करूनही जागा रिक्तचकारंजा (घाडगे) : तालुक्यातील धामकुंड येथील जिल्हा परिषद शाळेला सतत एक वर्षापासून मागणी करूनही शिक्षण विभागाने शिक्षक दिला नाही. येत्या सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. या वर्षातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी शाळा उघडण्याच्या दिवशीच आपली मुले शाळेत ‘न’ पाठविता शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. धामकुंड गाव जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती गोपाल कालोकर यांचे आहे. त्यांनीही शाळेला शिक्षक देण्याची मागणी केली. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. या शाळेतील शिक्षकाचे पद रिक्तच राहणार असल्याचे चित्र कायमच आहे. जिल्हा परिषदेच्या धामकुंड येथील शाळेत पहिली ते पाचवी वर्ग आहे. शाळेची पटसंख्या २३ आहे. येथे शिक्षकांची दोन पदे मंजूर आहेत. पण गत एक वर्षापासून शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी आणि जि.प. सदस्य कालोकर यांनी शिक्षणाधिकारी यांना एक शिक्षक मिळावा म्हणून निवेदन दिले. जि.प.च्या बैठकीमध्ये मागणीचा पाठपूरावा केला. तरीही शिक्षक दिला नाही. शिक्षकाच्या मागणीवरून टाळाटाळीची भूमिका घेत गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. गत वर्षीचीच स्थिती याही वर्षी कायम राहण्याचे चित्र आहे. जिल्हा बदलीमध्ये एक शिक्षक देवू असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. पण बदली झालेला शिक्षक अद्याप धामकुंडला पोहचलाच नाही. त्यानंतर शिक्षण विभागाने दुसरी कोणतीच तरतुद केली नाही. यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी येथे काय होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)जि.प.च्या दुर्लक्षामुळे शाळेवर दुर्दैवी वेळवर्ष लोटले पण अद्यापही धामकुंड शाळेला शिक्षक न दिल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. ही मागणी पूर्ण करण्याकरिता शाळेच्या पहिल्या दिवशीच शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दुर्देवी निर्णयाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. पंचायत समिती स्तरावर जादा शिक्षक नसल्यामुळे शिक्षक देता आला नाही. पण शिक्षक देणे गरजेचे आहे. तसा अहवाल जि.प. शिक्षण विभागाला कळविला आहे. जिल्हा बदलीचे वेळेला शिक्षक दिल्या जाईल, असे जि.प. शिक्षण विभागाने कळविले होते.- धनंजय उमेकर, गटशिक्षण अधिकारी, कारंजा (घाडगे)