शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सातगावची निवडणूक होणार रंगतदार

By admin | Updated: July 23, 2015 01:50 IST

सालेकसा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी सातगाव (साखरीटोला) ग्रामपंचायतची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सभासदांच्या नऊ जागा : २१ उमेदवार रिंगणात साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी सातगाव (साखरीटोला) ग्रामपंचायतची निवडणूक अतिशय रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नऊ सभासदांसाठी तीन वार्डातून एकूण २१ उमेदवार रिंगणात असून साम, दाम, दंड या तिन्ही साधनांचा वापर करून विजयश्री खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या जि.प. व पं.स.च्या निवडणुकीत जि.प.चे अध्यक्ष पद व पं.स.चे सभापती पद या गावाला मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात साखरीटोल्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता येत्या २५ जुलैला ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. ग्रा.पं. निवडणूक गावात तणावाचे वातावरण निर्माण करते. ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात. त्यामुळे ग्रामपंचायत आर्थिक स्त्रोत मिळवून देण्याचे माध्यम झाल्याने अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. सध्या ग्रामपंचायत सातगावच्या निवडणुकीत पक्षविरहीतपणा असला तरी आपापल्या परीने वेगवेगळे पॅनल तयार करून पॅनलच्या झेंड्याखाली निवडणूक लढविली जात आहे. प्रत्येक पॅनलने काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून जुन्या अनुभवी चेहऱ्यांनासुध्दा उमेदवारी दिली आहे. साखरीटोला व सातगाव या दोन्ही गावे मिळून ग्रामपंचायत असून साखरीटोला वार्ड- १ मधून सहा उमेदवार, वार्ड- २ मधून नऊ उमेदवार, तर वार्ड- ३ (सातगाव) येथून सहा उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच पद अ.जा. (महिला) प्रवर्गाकरिता आरक्षित आहे. रिंगणात अ.जा.च्या तीन महिला वेगवेगळ्या पॅनलच्या झेंड्याखाली रिंगणात असल्याने अधिक रंगत वाढली आहे. साखरीटोला येथे जात फॅक्टर मोठ्या प्रमाणात काम करण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षातील विकास व पुढे गावाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणाऱ्या क्षमतावान लोकांना कितपत लोक पसंती देतात, हे लवकरच कळेल.