शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सेवाग्रामात राबविले स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST

गांधीजींच्या १५१ व्या जयंती निमित्ताने आश्रमात अखंड सूतकताईने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात येणार आहे.सकाळी ५.४५ वा.नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून रामधून गात प्रभातफेरी काढण्यात येईल.आदी निवासला वळसा घालून बापू कुटी परिसरात प्रार्थना होईल आणि ६.०० वा बापू कुटीतील वरांड्यात अखंड सूतकताईला सुरूवात होईल. सामुहिक श्रमदानानंतर ९.०० वा जालंधरनाथ व विद्यार्थी वैष्णव जन तो हे भजन गातील.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा पुढाकार : जुन्या वस्तीची करण्यात आली स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ग्रामपंचायतीच्यावतीने बुधवारला जुन्या वस्तीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.महात्मा गांधीजींची १५१ वी जयंती देशच नव्हे तर जगात साजरी होणार आहे. गांधीजींनी सेवाग्राम येथे स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले होते. गांधीजींच्या जयंती पर्वावर गुरूवाडी ते चौकापर्यंत मुख्य मार्गाची साफसफाई करण्यात आली. रस्त्यावरील केरकचरा काढून खराटा मारण्यात आला. यावेळी सरपंच सुजाता ताकसांडे, पंचायत समिती सदस्या भारती उगले, उपसरपंच सुनील पनत, सदस्य मुन्ना शेख, मुरलीधर कुमरे, भारती कडू, प्रिया कांबळे, अंगणवाडी सेविका निर्मला देवतळे, सरला हटवार, सुरेखा वांढरे, मदतनीस रेखा उगले, आशा वर्कर रंजना भोयर, नलिनी ओंकार, अशोक उगले, सतीश बावणे , विजय आळणकर, पुंडलिक मोहनकर, अशोक राऊत, निर कोल्हे,सौरभ ताकसांडे आदीसह नागरिक सहभागी झाले होते.अखंड सूतकताईने वाहणार आदरांजलीगांधीजींच्या १५१ व्या जयंती निमित्ताने आश्रमात अखंड सूतकताईने राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यात येणार आहे.सकाळी ५.४५ वा.नयी तालिम समिती परिसरातील घंटी घरापासून रामधून गात प्रभातफेरी काढण्यात येईल.आदी निवासला वळसा घालून बापू कुटी परिसरात प्रार्थना होईल आणि ६.०० वा बापू कुटीतील वरांड्यात अखंड सूतकताईला सुरूवात होईल. सामुहिक श्रमदानानंतर ९.०० वा जालंधरनाथ व विद्यार्थी वैष्णव जन तो हे भजन गातील.औपचारीक स्वागत व प्रास्ताविक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी .आर.एन .प्रभू करतील.९.३५ वा.अविनाश काकडे महात्मा गांधीजींनी पहिले भाषण बनारस हिंदी विद्यापीठात व सेवाग्राम येथील केलेल्या भाषणाच्या प्रती बाबत प्रास्ताविक व विमोचन करतील. परिसरातच जालधंरनाथ आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली सत्य, अहिंसा,शांती, जय जगत प्रदर्शन लावण्यात येणार आहेत. सायंकाळी ५.३० वा.प्रार्थना भूमिवर सामुहिक सूतकताई होऊन दैनिक प्रार्थना सायंकाळी होणार आहे.लॉकडाऊनमुळे आश्रम पर्यटकांसाठी अजूनही बंदचसेवाग्राम : गांधीजींची जयंती या वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही.मार्च महिन्यापासून बापूकुटी पर्यटन स्थळ बंद करण्यात आले आहे.यात आश्रमही बंद ठेवण्यात आले आहे.आश्रमातील दुकाने पण बंद ठेवण्यात आली आहे. पण गांधी जयंतीला सुरू करण्यात येत असल्याने स्वच्छता आणि तेलपाणी देण्याचे कामही सुरू आहे. आश्रम पर्यटकांसाठी बंद केले असले तरी दैनंदिन व्यवहार मात्र नेहमीप्रमाणे सुरूच आहेत.आश्रमातील विविध प्रजातींची झाडे बापूंच्या पर्यावरण प्रेमींनी साक्ष दर्शविते.प्रसंगाला झाडे लावण्याचा प्रघात त्या काळात होता १९३६ चे पिंपळ झाड,बा ने लावलेले बकुळ,विनोबांनी भूदान चळवळ प्रसंगी लावलेले पिंपळ झाड. झाडे आश्रमातील वैशिष्टये असून झाडे वाचवा संवर्धन करा असा संदेश यातून दिलेल्या जात आहे. आश्रमात पर्यटकांना बंदी असली तरी नतमस्तक होण्यासाठी गांधीप्रेमी येणार यात शंका नाही.आश्रम बापूंच्या जयंती साठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम