शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या तावडीतून वाचवून सांबराच्या पिलाला जीवदान

By admin | Updated: October 21, 2015 02:25 IST

ढगा भुवन परिसरात कुत्र्याच्या कळपाने जखमी केलेल्या सांबराच्या पिल्याला पशुवैद्यकाकडून उपचार करून घेत जंगलात सोडण्यात आले.

मासोद येथील घटना : पिलाला जंगलात सोडल्यामुळे टीकाआकोली : ढगा भुवन परिसरात कुत्र्याच्या कळपाने जखमी केलेल्या सांबराच्या पिल्याला पशुवैद्यकाकडून उपचार करून घेत जंगलात सोडण्यात आले. याबाबत वन्यजीव अभ्यासकाकडून टिकेचा सूर उमटला आहे.सोमवारी सायंकाळच्या सुमारास रामबाबा समाधी मंदिरात पुजारी मनोहर महाराज यांच्या समवेत बिपीन पांडे, शेख आसिफ, सोयल शेख हे बसले होते. दरम्यान जंगलातील झाडांतून कुत्र्यांचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने ही मंडळी गेली असता कुत्रे सांबराला चावा घेत असल्याचे दिसून आले. त्यांनी दगड मारून कुत्र्यांना हाकलून सांबाराच्या पिल्याला कुटीत आणले. त्याला दूध पाजल्यानंतर खरांगणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण प्रतिसाद मिळाला नाही. उपवन संरक्षक मुकेश गणात्रा यांचाही भ्रमणध्वनी प्रतिसाद देत नव्हता. अखेर वनविभागाच्या वर्धा कार्यालयाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली.त्यांच्या सूचनेवरून वनरक्षक राऊत हे मासोदच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दाखल झाले. जखमी पिल्यास पिपल्स फॉर अ‍ॅनिमलकडे दाखल न करता उपचार करून जंगलात सोडण्यात आले. एकदा उपचार करून ते सुधारले नाही तर जंगलातील वन्यजीवांपासून त्यास धोका होऊ शकतो.(वार्ताहर)