मनरेगातील प्रकार : वरिष्ठांचे दुर्लक्ष घोराड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत काम न करताच मजुरी दिल्या जात असल्याची ओरड परिसरात आहे. यावर नियंत्रण ठेवून चौकशी करणे गरजेचे झाले आहे. तशी मागणी येथील नागरिक करीत आहे.तालुक्यात नरेगा अंतर्गत मागेल त्याला काम देण्यात येते. या कामगारावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाने ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती केली आहे. परंतु बहुतांश ग्रामपंचायत मध्ये कामगारावर लक्ष ठेवण्यास वेगळ्याच व्यक्तीची नियुक्ती केली असल्याचे निदर्शनास येत आहे. काम न करताच मस्टर मंजूर करून त्याला रोजगार दिला जात असल्याने नियमित काम करीत असलेल्या मजुरांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसते.नरेगामध्ये कामाचा मोबदला दिला जात असताना काम करणाऱ्यांवर वेगळ्या मानसाची देखभाल कशासाठी अशी कुजबुज सुरू असून भ्रष्ट्राचाराला पाठबळ देण्याचा हा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे.पंचायत समिती स्तरावरून अचानक पणे मजुरावर उपस्थितीबाबत लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा असणे गरजेचे झाले आहे. काम न करता वेतन मिळत असेल तर काम करणाऱ्यावर हा अन्याय होत असल्याचे मत नरेगातील कामगार व्यक्त करीत आहे. शेतावर काम करणाऱ्या मजुराच्या प्रमुखाला अतिरिक्त मजुरी द्यावी लागते. असाच प्रकार नरेगामध्ये घडत असल्याने संबंधितत विभागाने यावर नजर ठेवणे आवश्यक झाले आहे. काम करीत असलेल्या मजुरांवरही अन्याय होऊ नये यासाठी हे गरजेचे आहे.(वार्ताहर)
काम न करताच मिळतो पगार
By admin | Updated: August 3, 2014 23:33 IST