शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉनला हरविण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा आली अलर्ट मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील ४९ हजार ४३० व्यक्तींना आतापर्यंत कोविडचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ४८ हजार ९७ व्यक्तींनी कोविडमुक्त झाले असून १ हजार ३२७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत तीन ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत. सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती कमी असली तरी डेल्टा पेक्षाही जास्त प्रभावी असलेल्या ओमायक्रॉनचे संकट वर्धा जिल्ह्यावर आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकाराची राज्यात एन्ट्री झाली आहे. जिल्ह्यात सध्या कोविडच्या या प्रकाराचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कोविड बाधिताला ग्रामीण भागातही चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी एक ऑक्सिजन बेड राहणार आहे.जिल्ह्यातील ४९ हजार ४३० व्यक्तींना आतापर्यंत कोविडचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ४८ हजार ९७ व्यक्तींनी कोविडमुक्त झाले असून १ हजार ३२७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात सद्यस्थितीत तीन ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत. सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती कमी असली तरी डेल्टा पेक्षाही जास्त प्रभावी असलेल्या ओमायक्रॉनचे संकट वर्धा जिल्ह्यावर आहे. कोविडच्या याच प्रकाराला ब्रेक लावण्यासह त्याच्याशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी एक इमर्जन्सी ऑक्सिजन बेडची व्यवस्था राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन मेडीकल ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा वापर गंभीर रुग्णांसाठी केला जाणार आहे.

पीएससीतच राहणार कोविड केअर सेंटर-    कोविडची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने काही उपाययोजना केल्या होत्या. कोविडची दुसरी लाट ओसरल्यावर शाळा सुरू होण्याचे संकेत मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दहा रुग्ण खाटांचा समावेश असलेले कोविड केअर सेंटर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन जि. प. चा आरोग्य विभाग कामाला लागला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हेच कोविड केअर सेंटर कोविडचा नवा प्रकार असलेल्या ओमायक्रॉनला हरविण्यासह कोविड संकट काळात प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी उपयुक्तच ठरणार आहे.

पुर्वी कोविड केअर सेंटर मध्ये होता शाळा अन् वसतिगृहांचा समावेश-    कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान जिल्ह्यात २१ तर दुसऱ्या लाटेदरम्यान १९ कोविड केअर सेंटर होते. त्यापैकी एक कोविड केअर सेंटर अजूनही कार्यरत आहेत. असे असले तरी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तब्बल १६ निवासी शाळा तसेच वसतिगृहांचा समावेश होता. पण आता शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातच प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा खाटांचे कोविड केअर सेंटर तयार होणार आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक काेविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा रुग्ण खाटांचे कोविड केअर सेंटर राहणार असून प्रत्येकी एक इमर्जन्सी ऑक्सिजन बेड राहणार आहे.- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जि. प. वर्धा.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या