लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलीस विभाग आॅनलाईन झाला आहे. सर्वच कामे संगणकावर होत आहेत. दाखल होणारी तक्रारही संगणकावर थेट टाईप केल्या जात जात आहे. या तक्रारीची प्रत अनेकांना हवी असल्याने ती देताना मात्र पोलिसांची चांगलीच धावपळ होत असल्याचे वर्धेत दिसून आले आहे. ही धावपळ दुसºया कुठल्या कारणाकरिता नाही तर प्रिंट काढण्याकरिता आवश्यक असलेल्या कोºया कागदाकरिता आहे.कोºया कागदांसह पेन आणि इतर किरकोळ खर्चाकरिता प्रत्येक ठाण्याला महिन्याकाठी इन्व्हेस्टीगेशन शुल्क म्हणून एक ठराविक रक्कम दिल्या जाते. या रकमेतून हा खर्च अपेक्षित आहे. मात्र काही ठाण्यात हा फंड सुरक्षित ठेवून तक्रारदारालाच कागद आणण्याचा सल्ला दिल्या जात असल्याचे दिसून आले आहे. आधीच अडचणीत असलेला तक्रारदार यामुळे आणखीच अडचणीत येत आहे. संगणकातून तक्रारीची प्रिंट काढल्यानंतर उर्वरीत कागद त्या तक्रार दाराला परत देणे अपेक्षित असताना तसे होत नाही. ते कागद त्याच्याकडून घेवून ते दुसºया कामांत वापरले जात जातात.इन्व्हेस्टीगेशन शुल्क म्हणून जिल्ह्याला १० लाख रुपये मिळत आहे. या १० लाखांतून जिल्ह्यातील मोठ्या ठाण्याला महिन्याकाठी ११ हजार ५०० रुपये आणि लहान असलेल्या ठाण्याला ७ हजार ५०० रुपये देण्यात येत आहेत. या पैशातून ठाण्यातील कामकाज आणि त्याकरिता लागणारे साहित्य खरेदी करण्याच्या सूचना आहेत. असे असताना या रकमेतून कामकाज चालविण्यापेक्षा तक्रार दाराकडून रक्कम घेण्याचा प्रकार सुरू आहे. ठाण्यांचा खर्च यातूनच निघत असताना हा प्र्रकार येथे सुरू आहे.नागरिकांना होणारा त्रास आणि वाढणारा कागदाचा वापर कमी करण्याकरिता पोलीस विभाग आॅनलाईन झाला. इ तक्रारही सुरू झाली. असे असताना तक्रार दाराला आजही एफआयआरची प्रत मिळविण्याकरिता पैसे मोजावे लागत आहेत. बाजारातून कागद विकत आणून प्रिंट घ्यावी लागत आहे. प्रत आवश्यक असलेला व्यक्ती कागद विकत आणून त्याची कॉपी काढत तर शिल्लक कागद पोलीस ठेवत आहेत.कार्यालयीन कामाकरिता कागदांची कमतरतापोलीस ठाण्यात विविध कामे करण्यात येतात. यात अटकेतील आरोपीची तक्रार प्रत तयार करणे, त्याला न्यायालयात नेण्याकरिता आवश्यक असलेले कागदपत्र तयार करण्याकरिता कोरे कागद लागतात. या कागदांकरिता कर्मचाºयांकडून ते राखून ठेवण्यात येत असल्याचे समोर आले आहे.कागद ठाणेदारासह कर्मचाºयांच्या टेबलातठाण्याच्या कामांकरिता आलेले कागद वापरण्यापेक्षा ते ठाणेदाराच्या अथवा त्यांच्या अधिनस्त असलेल्या मोठ्या कर्मचाºयाच्या काटात सुरक्षित ठेवून असल्याचे दिसून आले आहे. यामुळे तक्रार नोंदविण्याकरिता आलेल्या तक्रारदाराला प्रिंट काढण्याकरिता स्वत: कागद विकत आणण्याची वेळ आली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पोलिसांची कागदांकरिता धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:48 IST
पोलीस विभाग आॅनलाईन झाला आहे. सर्वच कामे संगणकावर होत आहेत. दाखल होणारी तक्रारही संगणकावर थेट टाईप केल्या जात जात आहे.
पोलिसांची कागदांकरिता धावपळ
ठळक मुद्देप्रत्येक ठाण्याला ‘इन्व्हेस्टीगेशन शुल्क’ : मिळणाºया रकमेतून किरकोळ खर्च