शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टी दरवाढीविरूद्ध खाण, क्रशर बंद; गौण खनिज महागणार

By admin | Updated: November 26, 2015 02:13 IST

राज्य शासनाने ११ मे २०१५ पासून गौण खनिजावरील रॉयल्टी १०० टक्के वाढवून ४०० रुपये केली आहे. पूर्वी ही रॉयल्टी प्रती ब्रास २०० रुपये होती.

अन्य राज्यात रॉयल्टी अल्प : १०० टक्के वाढ झाल्याने व्यवसाय मोडकळीसवर्धा : राज्य शासनाने ११ मे २०१५ पासून गौण खनिजावरील रॉयल्टी १०० टक्के वाढवून ४०० रुपये केली आहे. पूर्वी ही रॉयल्टी प्रती ब्रास २०० रुपये होती. यामुळे खाण व क्रशर धारक तसेच सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रातील तसेच खाण उद्योगातील मजुरांवरही उपासमार व बेरोजगारीची वेळ आली आहे. याविरूद्ध गौण खनिज क्रशर धारकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. प्रारंभी जिल्ह्यापूरता मर्यादित असलेला बंद आता विदर्भात सर्वत्र पुकारला गेला आहे.साधारणात: रॉयल्टीवर दरवाढ करताना या उद्योगधंद्यातील एकंदरीत उत्पादन खर्च, शेजारील राज्याचे रॉयल्टीचे दर या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा असते; पण बांधकाम क्षेत्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका घेणाऱ्या दगड, मुरूम, गिट्टीवर ४०० रुपये प्रती ब्रास रॉयल्टी लावली. यामुळे सामान्य जनतेचे घर बांधणचे स्वप्न भंगणार आहे. एवढेच नव्हे तर मुरूम, चुरीच्या किमतीपेक्षा रॉयल्टी दुपटीने वाढली आहे. मागील काळात दगड खाण क्षेत्रातील शिथील धोरणामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार या व्यवसायात उतरले आहेत. कोट्यवधीचे कर्ज घेऊन उद्यो सुरू केला आहे. हजारो रोजगार या व्यवसायात काम करीत आहे. अशातच १०० टक्के रॉयल्टीची दरवाढ झाल्याने क्रशर धारकांवर कर्जबाजारी व बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.या प्रकरणी शेजारील अन्य राज्यांचे रॉयल्टीचे दर पाहिले तर मोठी तफावत दिसून येते. यात गुजरात राज्यात १०० रुपये प्रती ब्रास, मध्यप्रदेश १०० रुपये, राजस्थान १०० रुपये, आंध्रप्रदेश १३२ रुपये, छत्तीसगढ ८० रुपये प्रती ब्रास आहे. शेजारील राज्यातील रॉयल्टीचे दर १५० रुपये प्रती ब्रासच्या आत आहेत; पण महाराष्ट्रात आधीच २०० रुपये प्रती ब्रास असलेली रॉयल्टी १०० टक्के वाढवून ४०० रुपये करण्यात आल्याने व्यवसायच कोलमडण्याची वेळ आली आहे. खान व्यवसायात काम करीत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महागाईमुळे क्रशर व्यवसायाला लागणारे सुट्या साहित्याच्या किमती, विजेचे बिल, विस्फोटक, कुशल, अकुशल मजुरांची मजुरी या सर्व बाबींमुळे हा व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे. यातच १०० टक्के रॉयल्टी वाढीमुळे हा उद्योगच मोडकळीस आला आहे.रॉयल्टीवाढीचा हा निर्णय होताच राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, खनिकर्ण मंत्री, खनिकर्म राज्यमंत्री, पालकमंत्री तसेच मुख्य सचिव, प्रधान सचिव यांना लेखी निवेदने देत रॉयल्टी कमी करण्याची मागणी केली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे खान व क्रशर उद्योजक संघाने बंद पुकारला आहे.(कार्यालय प्रतिनिधी)