शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च विद्युत वाहिन्यांतील बिघाड शोधणार रोबोट

By admin | Updated: June 26, 2015 02:13 IST

उच्च विद्युतवाहिनी खंडित झाली वा कुठलीही समस्या आली तर निराकरण करणे जिकरीचे काम आहे.

वर्धा : उच्च विद्युतवाहिनी खंडित झाली वा कुठलीही समस्या आली तर निराकरण करणे जिकरीचे काम आहे. विद्युत वाहिन्या उंचावर असल्याने वेळीच समस्या निदर्शनास येत नाही आणि समस्या कुठल्या भागात आहे, हे शोधणे कठीण होते. याबाबत बापुराव देशमुख अभियांत्रिकी महा.च्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांनी अभ्यास करून समस्या ‘शोधण्यासाठी रोबोटीक मोनोटोरिंग आॅफ हाय पॉवर ट्रान्समीशन लाईन’ ही प्रणाली विकसित करून रोबोची निर्मिती केली. याद्वारे उच्च विद्युत वाहिन्यांतील समस्या त्वरित शोधणे शक्य होणार आहे.सुरज पाल, सागर पाठक, सतीश वंजारी, स्वप्नील बऱ्हाटे, तृष्णा आत्राम, आशुतोष साहुरकर या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ६५० केव्हीच्या वर असलेल्या विद्युत वाहिनी वा वीज प्रवाह खंडित झाला तर समस्या शोधणे जटील आहे. अगदी छोट्या समस्या निर्माण होतात; पण विद्युत वाहिनीमध्ये नेमके कुठे समस्या उद्भवली ती शोधणे आणि दुरूस्त करणे यासाठी हेलीकॉप्टरचा उपयोग होतो. हे कार्य मनुष्याद्वारे होत असल्याने त्यात धोकाही तेवढाच आहे. यासाठी एका रोबोटची निर्मिती केली. यात सेन्सर, हिट ट्रान्समीसन, सीसीटीव्ही कॅमेरा, झिब बी सेन्सर, जीपीएस, अशी प्रणाली रोबोमध्ये बसविली. या रोबोचे प्रात्यक्षिक २३० विद्युत वाहिनीचा प्रवाह असलेल्या एका मॉडेलवरही करण्यात आले. सदर रोबो उच्चविद्युत वाहिनीवर बसवून खाली लॅपटॉपच्या साह्याने मोनेटोरिंग करून रोबोमध्ये बसविण्यात आलेला कॅमेरा व जीपीएस माध्यमातून समस्या नेमकी कुठे आहे, हे दाखवेल. वाहिन्यांमध्ये बारिक-बारिक तार असतात. ते खंडित झाले तर कॅमेरा व नेमके लोकेशन खाली लॅपटॉपमध्ये दिसेल. यानंतर तंत्रज्ञ ही समस्या त्वरित सोडवू शकेल. उच्च विद्युत वाहिन्यांत आलेली समस्या रोबो डिटेक्ट करणार असून ही विद्युत विभागाला उपयोगी प्रणाली असल्याचे विद्यार्थी म्हणाले. याचे प्रात्यक्षिक राष्ट्रीयस्तरावर टेक्नॉवेन्झामध्ये करण्यात आले. यावेळी या प्रोजेक्टला मेजर प्रोजेक्ट गटात प्रथम पारितोषिकही प्राप्त झाले. या प्रकल्पाचे मार्गदर्शक इलेक्ट्रीकल इंजि. विभागप्रमुख प्रा. राकेश श्रीवास्तव यांनीही विद्युत क्षेत्रात अनेक समस्या उद्भवतात. त्या सोडविताना काळजी घ्यावी लागते. शॉक लागण्याच्या घटना घडतात. यासाठी मानवविरहित रोबोने समस्या शोधणे शक्य असल्याचे या प्रोजेक्टमधून दिसते, अशी प्रतिक्रीया दिली. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी उच्च विद्युत विभागातील समस्यांसाठी विद्यार्थ्यांनी कल्पकता दाखवित रोबो निर्माण केला. संशोधनाची दृष्टी विद्यार्थ्यांत निर्माण झाली व हेच ध्येय असल्याचे सांगितले.(कार्यालय प्रतिनिधी)