शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी कायद्याचा विरोध

By admin | Updated: December 29, 2016 00:44 IST

केंद्र शासनाकडून देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पत्रपरिषदेत माहिती : शुक्रवारी ईदगाह मैदानातून मुस्लिमांचा मूकमोर्चा वर्धा : केंद्र शासनाकडून देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून मुस्लीम समाजाच्या कायद्यावर गदा येणार आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. शरीयतमध्ये कायद्याचा हस्तक्षेप नकोच, अशी भूमिका मुस्लीम समाजाने घेतली आहे. याविरूद्ध वर्धा जिल्हा मुस्लीम कमिटीद्वारे शुक्रवारी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. देशात समान नागरिक कायदा लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो लागू होऊ नये म्हणून मुस्लीम समाज एकवटला आहे. हा कायदा लागू झाल्यास शरीयतमध्ये हस्तक्षेप होईल आणि तो कदापिही मान्य नाही. या कायद्याचा विरोध करण्याकरिता वर्धा जिल्हा मुस्लीम कमिटीद्वारे शहरात शुक्रवारी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. हा पहिला मोर्चा असल्याने केवळ पुरूष मंडळी सहभागी होणार आहे. मोर्चात सुमारे पाच ते सहा हजार मुस्लीम बांधव सहभागी होतील, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. यासाठी सर्व मुस्लीम बांधव स्पयंस्फूर्तपणे सहभाग नोंदविणार आहे. मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात येणार आहे. मूकमोर्चा शुक्रवारी दुपारी ३ वाजता महात्मा गांधी ग्राऊंड (ईदगाह मैदान) येथून निघणार आहे. बजाज चौक, बडे चौक, सीमा मेडिकल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मूकमोर्चामध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकारणाचा शिरकाव नसल्याचे मूकमोर्चा समितीचे अध्यक्ष जुबेर शेख यांनी स्पष्ट केले. इस्लाम व शरीयतच्या संरक्षणाकरिता मुस्लीम समाज आंदोलन करीत आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अर्शी मलिक, अता उल्लाह पठाण, हाजी सोहराब तुरक, शेख अफसर, शेख सलीम, शेख नईम, बबलू शफी, शेख राजा, वसीम अली, शेख नवाब, मो. मुर्तूजा मंसुरी, हासीफ कुरेशी, शेख इमू, हाजी तौफीक नुराणी, हाजी अलताफ भाई, अकरम शेख, शेख जमील, शेख सादीक, शेख मुश्ताक कुरेशी, कलाम अंसारी, सैयद इरशाद यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)