शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

देरडा येथील बोर नदीवरील क्षतिग्रस्त पुलाची दुरूस्ती करा

By admin | Updated: August 26, 2016 02:05 IST

मांडगाव सर्कलमधील सावंगी, देरडा येथील बोर आणि धाम नदीवरील सिमेंट काँक्रीटचा रपटा निकृष्ट बांधकामामुळे मागील पुरात वाहून गेला.

तहसीलदारांना साकडे : शेतकऱ्यांना आवागमनास अडचणसमुद्रपूर : मांडगाव सर्कलमधील सावंगी, देरडा येथील बोर आणि धाम नदीवरील सिमेंट काँक्रीटचा रपटा निकृष्ट बांधकामामुळे मागील पुरात वाहून गेला. यामुळे ५० गावांचा संपर्क तुटलेला आहे. हा रपटा पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. या पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत समुद्रपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे विनोद हिवंज व शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले.सावंगी, देरडा येथील बोर व धाम नदीवरील पाच वर्षांपूर्वी बनविलेला सिमेंट काँक्रीटचा रपटा निकृष्ट बांधकामामुळे पुराच्या पाण्याने वाहून गेला. यामुळे तेथील ५० गावांचा संपर्क तुटला. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. जीर्ण झालेल्या रपट्याची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हा मार्ग वाघोली ते सिंदी (रेल्वे) कडे जाण्याकरिता कमी अंतराचा आहे. शिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मांडगाव व समुद्रपूर येथे याच मार्गाने ये-जा करावी लागते; पण पूल वाहून गेल्याने रहदारीच ठप्प झाली आहे. दैनंदिन व्यवहार करतानाही अडचणीचा सामना करावा लागत आहे. क्षतिग्रस्त पुलाचा परिसरातील शेतकऱ्यांनाच अधिक फटका बसत आहे. यामुळे पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विनोद हिवंज, श्याम देशमुख, विठ्ठल लेंडे, दीपक उईके, अनिरूद्ध मुंजेवार, राजकुमार वाघमारे, झाडे, दत्ता खेकडे, राजेंद्र डंभारे, अनिल मसकर, बाबाराव इतवारे, महादेव मसराम, मनोज बिसवासे, आकाश आत्राम आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)