शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका व भोगवट वर्गातील प्रकरणे निकाली काढा

By admin | Updated: July 12, 2014 01:40 IST

जिल्ह्यात नवीन कुटुंबाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापैकी काहींना शिधापत्रिकेचे विभाजन करण्याची आवश्यकता भासते.

वर्धा : जिल्ह्यात नवीन कुटुंबाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापैकी काहींना शिधापत्रिकेचे विभाजन करण्याची आवश्यकता भासते. तर काहींना गहाळ झालेल्या शिधापत्रिका नव्याने बनवून घ्यायच्या आहे. यासह शेतकऱ्यांना भोगवट वर्ग-२ च्या शेतीचे वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्याची अनेक प्रकरणे अजूनही शासकीय कार्यालयात प्रलंबित आहे. ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची मागणी आहे.याबाबत किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी वैभव नाहरकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, अनेक नागरिकांना अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कोणकोणती कागदपत्रे जोडायची, त्याची प्रक्रिया याची माहिती नसते. यानंतर किती दिवसात शिधापत्रिका प्राप्त होत याची सामान्य माहितीही नसते. त्यामुळे मोठया प्रमाणात गरजू नागरिकांची आर्थिक, मानसिक फसवणूक होते. महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. यासंर्भात किसान अधिकार अभियानकडे तक्रारी येतात. याआधारे हे निवेदन देण्यात आले. या कुटुंबाना वेळेत शिधापत्रिका प्राप्त करुन देण्याची गरज आहे. त्यासोबतच वर्ग-२ ची शेती वर्ग-१ लवकरात लवकर करण्याची गरज शेतकऱ्यांना शेतीचे व्यवहार, वाटणी, हस्तांतरणासाठी आहे. वर्धा उपविभागातून गाव स्तरावर महसूल विभागामार्फत एक दिवसीय शिबिरांचे आयोजन करुन एकाच दिवशी अर्ज, तपासणी, त्रुटी, संशोधन व प्रमाणपत्र आणि शिधापत्रिका वाटप कार्यक्रम आयोजित करावा. या नाविण्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी व गरजू नागरिकांना सहकार्य करण्यासाठी वर्धा उपविभागीय अधिकारी नावरकर यांना किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी निवेदन दिले. या शिबिरांच्या पूर्व तैयारी व सहभागासाठी किसान अधिकार अभियान प्रत्येक गावात व वर्धा शहरातील वार्डात माहिती देईल तसेच तयारीसाठी सहकार्य करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही सूचना योग्य असून यावर वर्धा सेलू व देवळी च्या तहसीलदारांची लवकरच बैठक लावून प्रथम प्रायोगिक उपक्रम काही गावात नंतर तिनही तालुक्यात घेण्याचे नावरकर यांनी सांगितले. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात मदत होईल व गैरसोय होणार नाही असे ते म्हणाले.(स्थानिक प्रतिनिधी)