शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

आमदारांसमोर महावितरण कर्मचाऱ्यांच्या कारभाराचा वाचला पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2021 5:00 AM

 थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही.  शेतातील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो महिनाभर दुरुस्त होत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात. वर्षभरापूर्वी नवीन वीज जोडणीकरिता डिमांडची रक्कम भरूनही अद्याप जोडणी मिळाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : येथील वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व लाईनमन यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या केळझर, आमगाव (खडकी) व नवरगाव (पुनर्वसन) या तीन गावांतील ग्रामस्थांसह सरपंचांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले. वीज वितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आंदोलनस्थळी जाऊन सरपंचांकडून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर उपविभागीय अभियंत्यांना बोलावून त्यांच्याकडून आश्वस्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही.  शेतातील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो महिनाभर दुरुस्त होत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात. वर्षभरापूर्वी नवीन वीज जोडणीकरिता डिमांडची रक्कम भरूनही अद्याप जोडणी मिळाली नाही. गावातील पथदिव्यांमध्ये बिघाड आल्यास ‘हे आमचे काम नाही’ असे लाईनमन सांगतो. कार्यालयात गेल्यावर कनिष्ठ अभियंता जीवतोडे व लाईनमन मानकर उडवा-उडवीची उत्तरे देतात, आदीमुळे केळझर, आमगाव (खडकी) व नवरगाव (पुनर्वसन) येथील सरपंचांनी ग्रामस्थांसह वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच आ. डॉ. पंकज भोयर यांनी आंदोलकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. कार्यालयात कर्मचारीच उपस्थित नसल्याने सेलूचे उपविभागीय अभियंता मनोज खोडे यांना बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीतच ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. आमगाव (खडकी) तील इंदिरानगर व नवरगाव (पुनर्वसन) येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील वीज जोडणी गावठाणच्या फिडरवर नसल्याने या गावात नियमित पाणीपुरवठा करताना अडचणी येतात. गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याचे वारंवार ग्रामस्थांनी कळविले. गावठाण फिडरवर जोडणी करण्याची मागणीही केली पण, दखल घेतली नाही. त्यामुळे कनिष्ठ अभियंता व लाईनमनची बदली करण्याची मागणी रेटून धरली. अखेर उपविभागीय अभियंता खोडे यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने रोष निवळला. यावेळी केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, उपसरपंच सुनील धुमोने,आमगावच्या सरपंच नंदा मंगाम, नवरगावचे सरपंच संजय गजांम, जि. प. सदस्य विनोद लाखे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विजय खोडे, फारुख शेख, कृष्णा वाकडे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरmahavitaranमहावितरण