शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी; दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरणी केली. पण, शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात खरीपाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात मात्र, वास्तव काही वेगळेच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात खरिपाची १७ टक्केच पेरणी : निकृष्ट बियाणे उठले जीवावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाचा सामना करत शेतकरी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामातील पेरणीसाठी सज्ज झाला होता. परंतु, शेतकऱ्यांमागील संकटांचे दुष्टचक्र थांबता-थाबेना. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने पेरणी केली. पण, शेतकऱ्यांनी लागवड केलेले कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यात खरीपाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात मात्र, वास्तव काही वेगळेच आहे.जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असताना शासनाने कुठलीही आर्थिक मदत केली नाही.बँकेने पीक कर्जासाठी टाळले म्हणून शेतकऱ्यांनी हातउसने कर्ज घेऊन काळ्या आईची ओटी भरली.जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ७६ हजार ६५४.७५ हेक्टरवर सोयाबीन, तूर, कपासीसह इतर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्यात सरसरी १७.३१ टक्के खरीपाच्या पिकाची लागवड करण्यात आल्याची माहिती आहे. वर्धा तालुक्यात तूर १०० हेक्टर, सोयाबीन १६० तर कापूस १३ हजार ६००, आर्वी तालुक्यात सोयाबीनची ८२७, तूर २१०, कापूस १५२० आष्टी तालुक्यात तूर ६३९, सोयाबीन १७४२, कापूस ३४६४, कारंजा तालुक्यात तूर ४६८.१, सोयाबीन ११५९.५, कापूस १८७८.१५, सेलू तालुक्यात तूर ३२१९, सोयाबीन ११ हजार ७५३, कापूस १९ हजार ६०२, देवळी तालुक्यात तूर ७३०, सोयाबीन १९०० तर कापसाची ११९७ हेक्टरवर, हिंगणघाट तालुक्यात तूर पिकाची ९७४, सोयाबीन ७११, कापूस ८०५४ तसेच समुद्रपूर तालुक्यात तूरीची २४९, सोयाबीनची ४५५ तर कापूस पिकाची १७९० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.अधून-मधून कोसळणाऱ्या पावसामुळे काही भागातील पेरण्या अद्यापपर्यंत थांबलेल्या आहेत. यंदा विविध नामांकित कंपन्यांचे सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाले आहे. अनेक भागात पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक झाली आहे. पेरणी होऊन बराच कालावधी लोटलेला आहे. मात्र, आठवडाभरात साधे कोंबही फुटले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी सरकारी दरबारी दाखल झाल्या नसल्या तरी गावोगावी सोयाबीन उगवले अथवा नाही, कृषी केंसद्र चालकांकडून बनावट बियाणे दिले जात आहे काय? याची चर्चा शेतकरी करीत आहेत.लॉकडाऊनकाळात बोगस बियाणे आले कोठून?कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच शेतकऱ्यांपर्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे बियाणे पोहचले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली. सरकार बांधावर खते व बियाणे पोहोचवू शकले नाही. मात्र, बोगस बियाणेही रोखू शकले नाही. त्यामुळे शेतकरी हंगामाच्या सुरुवातीलाच नागवला गेला आहे. याला जबाबदार कोण? लॉकडाऊनमध्ये बोगस बियाणे आले कुठून? शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची चौकशी करून संबधित बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.पंचनामे होणार, पण नुकसानभरपाई मिळणार काय?सध्या अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करुन पेरणी केली. परंतु, आठ दिवसांनंतरही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु, शेतकऱ्यांना खरच नुकसान भरपाई मिळणार काय, हा प्रश्न आहे. कारण मागील दोन वषार्पासून ही स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कागदपत्र देवून, पंचनामे होवूनही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आताही अशीच अवस्था होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संबंधित बियाणे कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.