शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा कहर; पिकांची राखरांगोळी

By admin | Updated: March 2, 2015 00:16 IST

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पिकांची राखरांगोळी केली आहे़ वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची आर्वी तालुक्यात नोंद झाली...

वर्धा : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पिकांची राखरांगोळी केली आहे़ वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची आर्वी तालुक्यात नोंद झाली असून गहू, चणा, तूर पिकांची धुळधाण झाली आहे़ अनेक शेतकऱ्यांनी तूर अद्याप काढली नव्हती़ पेट्या बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या; पण कालपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे त्या पेट्या शेतातच सडण्याची भीती व्यक्त होत आहे़ शिवाय वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील छतही कोसळले़ तब्बल १२ तासांपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व ग्रामीण नागरिकांचे मोठेच नुकसान झाले़(लोकमत न्यूज नेटवर्क)१२ तास संततधारतळेगाव (श्या.पं.) - शनिवारी दुपारी ४ वाजतपासून परिसरात वादळी वाऱ्यासह पावसास सुरूवात झाली़ कमी-अधिक १२ तास पाऊस झाल्याने शेतात लावलेल्या तुरीच्या वचन्याच्या गंज्या वादळामुळे उडाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गव्हाचे उभे असलेले पीक शेतामध्ये जमिनीवर लोळले़ मृगबहाराची संत्री गळाली. शेतकऱ्यांचे रोख रकमेचे पीक असणाऱ्या संत्र्याच्या मृग बहाराची संत्री वादळामुळे खाली आली. यामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. या परिसरातील गहू पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. हरभरा सवंगणीवर आला असताना अचानक हजेरी लावलेल्या वादळी पावसामुळे हरभरा पूर्णत: भिजला आहे. पावसामुळे शेतात सवंगलेली तूर, हरभरा आणि गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.शेतकऱ्यांच्या मागील संकटांची मालिका सुरूचकापसाला भाव नाही तर दोन आठवड्यानंतर पुन्हा वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे़ सर्वाधिक नुकसान गहू आणि संत्रा पिकाचे झाले आहे़ परिसरात सर्वत्र ऊंबईवर आलेला गहू शेतातच झोपला आहे़ यापूर्वीच्या वादळाने गव्हाचे दाने बारिक झाले होते़ रविवार सकाळपासून पाऊस सुरू असल्याने पावसाळ्याची झड असल्यागत दृश्य आहे़