शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस बेपत्ता; सोयाबीनने टाकली मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:32 IST

जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या असून त्याची फुले गळत आहेत. यामुळे शेंगा पकडणे शक्य नाही.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाचे सावट : फुलेही गळाली; कपाशीलाही फुले, पात्या नाही, जलसाठ्यात ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. पावसाअभावी सोयाबीनने माना टाकल्या असून त्याची फुले गळत आहेत. यामुळे शेंगा पकडणे शक्य नाही. परिणामी, सोयाबीनचे उत्पन्न गेल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शिवाय कपाशीचीही तिच अवस्था आहे. पाऊस नसल्याने जमिनी भेगाळल्या आहेत. यामुळे कपाशीलाही फुले-पात्या येत नसल्याने त्याच्या उत्पन्नाची आशा धूसर झाली आहे.आतापर्यंत आलेल्या पावसामुळे पिके हिरवी दिसत होती; पण जलसाठ्यात पाण्याचा थेंब नव्हता. पावसाअभावी जलसाठेही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे रबी हंगामही आताच धोक्यात आला आहे. दररोज आकाशात ढग दाटून येतात आणि पाऊस येईल, असे चित्र निर्माण होते; पण काही काळातच आकाश पुन्हा निरभ्र होऊन उन्ह तापते. यामुळे पिकांची अवस्था बिकट झाली आहे.यंदा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सर्वत्र भक्कम पाऊस पडेल, असे वाटत होते; पण तसे झाले नाही. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या; पण त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले. या परिस्थितीतही जिल्ह्यात दीड लाख हेक्टरच्या आसपास सोयाबीनचा पेरा झाला आहे तर अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यात आज-उद्या पाऊस येईल, असे वाटत असताना आता पावसाची आशाही मावळली आहे. यामुळे जिल्ह्यात कोरड्या दु्ष्काळाची चिन्हे आहेत.पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. शेतकºयांचा सण पोळा तोंडावर आला आहे. याच काळात पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे पोळ्याचा सण कसा करावा, असा विचार शेतकरी करीत आहेत. शेतात पिकांनी टाकलेल्या माना आणि गाठीला नसलेला पैसा, यामुळे शेतकºयांची चांगलीच वाताहत झाल्याचे चित्र आहे. यातच कर्जमाफीचाही आधार मिळत नसल्याने जिल्ह्यात शेतकºयांच्या आत्महत्या सुरूच आहेत. यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची मागणी जोर धरत आहे.