शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

भोसा ते सिंदी (रेल्वे) रस्त्याचे डांबरीकरण करा

By admin | Updated: October 19, 2016 01:25 IST

भोसा ते सिंदी (रेल्वे) या साडे पाच किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. याबाबत आ. समीर कुणावार,

ग्रामस्थांची मागणी : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसानवर्धा : भोसा ते सिंदी (रेल्वे) या साडे पाच किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. याबाबत आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन ४० दिवस लोटले; पण अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याबाबत आ. कुणावार यांना विनंती केल्यानंतर ०.५ किमी अंतरातील खड्डे बुजविण्यात आले. सद्या ५ किमी रस्त्यावर खड्ड्यांचे मालिका तयार झाली आहे. परिणामी, विद्यार्थी, नागरिक, मजूर तसेच ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डेमय मार्गाने दुचाकी, सायकल चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागतो. हातात सायकल घेऊन चालणेही कठीण झाले आहे. सिंदी येथे बाजारपेठ, विद्यालय, महाविद्यालय, नगर परिषद, तहसील आदी कामांसाठी नागरिकांना जावे लागते. शिवाय मजूर तथा वर्धा-नागपूर ये-जा करण्याकरिता रेल्वेसाठी सिंदी येथे जावे लागते. रस्ता खराब झाल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. भोसा हे गाव आ. कुणावार यांनी आदर्श गाव म्हणून निवडले आहे. आदर्श गावातील रस्त्याची स्थिती अशी असेल, तर इतर गावांचे काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)