शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नझूल लिजचा प्रश्न केवळ चर्चेपुरताच

By admin | Updated: December 23, 2014 23:09 IST

जिल्ह्यातील बहुतांश जमिनी सुमारे १०० वर्षांपूर्वी लिजवर दिल्या होत्या़ अनेक जमिनींची लिजची मुदत संपली असून ती वाढविण्याची प्रक्रिया केली जाते; पण त्यावर कायम निर्णय घेतला जात नाही.

वर्धा : जिल्ह्यातील बहुतांश जमिनी सुमारे १०० वर्षांपूर्वी लिजवर दिल्या होत्या़ अनेक जमिनींची लिजची मुदत संपली असून ती वाढविण्याची प्रक्रिया केली जाते; पण त्यावर कायम निर्णय घेतला जात नाही. यामुळे अनेक वर्षांपासून राहूटी करून असलेल्या सामान्यांना सध्या विक्री व हस्तांतरण प्रक्रियेचे आदेश नसल्याने व्यवहार रखडले आहेत. वर्धा जिल्ह्यात सुमारे पाच हजारांवर प्रकरणे प्रलंबित असल्याने सामान्यांची अडचण झाली आहे. शासनाने वाणिज्यिक, औद्योगिक, निवासी तसेच धर्मदाय कारणांसाठी जमिनी भाडे पट्ट्यांवर दिल्या. १९२४-२५ पासून वर्धा जिल्ह्यातील अनेकांना अशा पद्धतीने जमिनी भाडेपट्ट्यावर देण्यात आल्या़ प्रत्येक ३० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भाडेपट्ट्यांचे नूतनीकरण केले जाते. आता २०१४ मध्ये मुदत संपणाऱ्या लिजवरील जमिनीचे नूतनीकरण होत आहे. लिज वाढविण्याची प्रक्रिया शासनाकडून केली जाते; पण कायम उपाययोजनेसाठी पुढाकार घेतला जात नाही. यामुळे निवासी असलेले सामान्य नागरिक कात्रीत अडकले आहेत. जीवापाड जपलेले घर अद्याप आपले नाही, ही जाणीव त्यांना त्रस्त करीत आहे. याबाबत अनेकांनी मुख्यमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, पाठपुरावा केला; पण न्याय मिळाला नाही. नागपूर अनेक अधिवेशने या मुद्याने गाजविली; पण तोडगा निघाला नाही. नझुल लिजबाबत ६ जानेवारी २००३, १९ जून २००७, २७ नोव्हेंबर २००७, १० आॅक्टोबर २०१२ आणि १२ डिसेंबर २०१२ असे पाच अध्यादेश निघाले़ यानंतर २०१४ मध्ये सुधारित ेअध्यादेशही आला़ यात विक्री, हस्तांतरण करायचे असेल तर सदर जमीन भाडेपट्टीवर घेतली, तेव्हापासून कर अदा करण्याच्या सूचना आहेत़ यामुळे नागरिकांनी नांगीच टाकली़ नवीन सरकारकडून जनतेला अपेक्षा आहे; पण या अधिवेशनात चर्चाच झाली नसल्याने तीही मावळली़ जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करून शहर व जिल्ह्यातील नझूल लिजचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांच्यासह नागरिकांची आहे़(कार्यालय प्रतिनिधी)